मुंबई : कोकणाने लेखक ,साहित्यिक, कवी,राजकारणी,समाजसेवक , तीन मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधि दिले आहेत. या महाराष्टासाठी स्वातंत्रलढ्यात आहुती दिली. परंतु सत्तर वर्षात कोकणवासियांच्या हाल अपेष्टा वाढत चालल्या आहेत. कोकणवासीयांच्या या समस्यांबाबत विद्यमान सरकारने तोडगा न काढल्यास बसपा रस्त्यावर उतरेल अशा इशारा बसपाच्या वतीने कोकण परीषदेत देण्यात आला.
भाजप-शिवसेनेने कोकणवासियांचे शोषण केल्याचा आरोप देखिल बसपाने केला आहे. या समस्यांसोडविण्यासाठी परिषदेत ठराव पास करण्यात आला. केंद्रींय मंत्रीरामदास आठवले व भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेरता धोरणात्मक टिका करण्यात आली.
धम्मचक्र परिवर्तनदिनाचे निमित्त साधून , कोकण व मुंबई तील नागरिकांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्यासाठी बसपाने षणमुखानंद हाँल येथे आयोजित केलेल्या कोकणवासियांच्या मेलाव्यासाठी कोकणातील बहुजन समाजातील कार्यकर्त्याचा प्रचंड प्रतिसाद पहायला मिलाला. मुंबईतील षणमुखानंद हाँल येथे बसपाच्या वतीने रविवार १४ आॅॅक्टोबर रोजी कोकण परिषदेचे आयोजन केले होते.
या परिषदेसाठी मार्गदर्शक म्हणून बसपाचे प्रभारी खा.अशोक सिध्दार्थ ,प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे, प्रभारी ना तु खंदारे, संदिप ताजने, संजीव सदाफुले, कृष्णा बेले, नदिम चौधरी, दयानंद किरतकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक राज्याचेप्रभारी प्रमोद रैना म्हणाले की, संपुर्ण दशात महाराष्टाची विचारधारा सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा येथे जन्म झाला. परंतु त्यांची विचारधारा अंमलात न आल्यामुळे बहुजनांची सत्ता येत नाही.यावेळी सुरेश साखरे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात कोकणात लोकांच्या मूलभूत समस्या अजुनही संपलेल्या नाहीत.कोकणातील समस्या सेना भाजप सोडविणार नसेल तर कोकणी माणूस शांत बसणार नाही. तो पेटल्याशिवाय राहणार नाही. या समस्यांबाबत विद्यमान सरकारने तोडगा न काढल्यास बसपा रस्त्यावर उतरेल अशा इशारा प्रदेश अध्यक्ष साखरे यांनी दिला. देशातील तीन नेत्यांमध्ये आगामी पंतप्रधान म्हणून मायावती यांचे नाव घेतले जाते. या राज्यातील आंबेडकरी नेते काँग्रेस भाजपकडे तिकिटासाठी भिक मागतात. निवडणूक चिन्ह उसने घेत असल्याचा घनाघाती आरोप साखरे यांनी केला. बसपाचे प्रदेश सचिव दयानंद किरतकर म्हणाले की, मुंबई कोकणवासियांचीअसून कोकणातील जनतेसाठी कोणतीही फले दिली गेली नाहीत. येथील बहुजन समाजाच्या हाल अपेष्टा भरपूर आहेत. कोकण निसर्ग रम्य आहे परंतु रस्ते खराब आहेत. शेती करण्यासाठी व गणपतीकरिता कोकणवासी कोकणात जातो. परंतु महाराष्टातील अपघाताचे सगल्यात जास्त प्रमाण कोकणात आहे. भाजप आणि काँग्रेस कोकणवासियांच्या मुलावर उठलेली आहे. आजची कोकण परिषद य शस्वी झाली आहे. कोकणवासीयांचा जोश पाहता आगामी निवडणुकीत कोकणात क्रांती होईल. बसपा आगामी निवडणुकीत कोकणात इतिहास घडविणार. नदिम चौधरी, प्रशांत इंगले, रामसुमेर जैसवाल, संदिप ताजने, संजीव सदाफुले,सुनिल खांबे, इत्यादीनी विचार मांडले.या मेळाव्यासाठी हाँलच्या बाहेर कार्यकर्त्यानी अलोट गर्दी केली होती. या परिषदेचे प्रास्ताविक कोकणातील राजेंद्र अहिरे यांनी केले. तर सुत्रसंचालन शामराव जैसवाल यांनी केले. राजपाल गवांदे यांनी आभार मानले.