ठाणे

लोकलच्या गर्दीमुळे आणखी एक डोंबिवलीकर तरुणाचा मृत्यू 

डोंबिवली  :-  ( शंकर जाधव )  दोन दिवसांपूर्वी कोपर रेल्वे ट्रक क्रॉस करीत असतानाच एकाच लहान बालकास दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच  मंगळवारी  एकदा डोंबिवली ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधील गर्दीने तोल सुटल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला.
लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका डोंबिवलीकर तरूणाचा बळी गेला आहे.
    विपेन्द्र वीरेंद  यादव  ( २९ ) असे  लोकलच्या गर्दीत बळी गेलेल्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी येथील रॉकेल डेपोमधील यादव निवास मध्ये हा तरुण राहत होता. विपेन्द्र   यादव हा एका खाजगी कंपनीत कामाला होता. सकाळी साडे नऊच्या सुमारास विपेन्द्र  हा डोंबिवली रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर ५ वरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढला. लोकलमध्ये खूप गर्दी असल्याने नितेंद्रला आत शिरता आले नाही. त्यामुळे लोकलच्या दरवाज्याला लटकून त्याला प्रवास करावा लागला. मात्र डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकादरम्यान नितेंद्र लोकलमधून खाली पडल्याचे समजताच लोकलमधील प्रवाशांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना कळवले. यात नितेंद्रचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वी भावेश नकाते आणि धनश्री गोडवे हे दोघे लोकलच्या गर्दीचे बळी ठरले असतानाच, नितेंद्रच्या मृत्यूने पुन्हा डोंबिवली हळहळली आहे. गर्दीने भरलेली लोकल स्थानकात येताच जो-तो जिवाच्या आकांताने लोकलमध्ये चढण्यासाठी प्रयत्न करतो. या नादात अनेक जण जखमी होतात, तर काहींचे जीवही जातात. डोंबिवली सारख्या प्रवाशांनी खचाखच भरलेलं शहर देखील अपवाद नसल्याचं वाढत्या अपघातांच्या घटनांवरून स्पष्ट झालं आहे.
      २०१८ वर्षात  डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या  हद्दीत  रेल्वे अपघातात ६६ तर 
२०१९ वर्षात १ जानेवारी ते ५ फेब्रेवारी  या दिवसात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्याहद्दीत २१ जणांंचा  मृत्यू झाल्याची नोंद आहे. 

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!