नवी मुंबई

पूरग्रस्तांसाठी विभागीय मदत कक्ष बेलापूर येथे ११ आँगस्ट पासून – कोकण विभागीय आयुक्त श्री शिवाजीराव दौंड

• आवश्यक वस्तूंची मदत जमा करण्याचे आवाहन
• प्रशासन तत्काळ पुरग्रस्तांपर्यंत वस्तू पोहोचवणार

नवी मुंबई : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील निवारा कॅम्पमधील पूरग्रस्तांसाठी तात्काळ मदत उपलब्ध करुन देण्यासाठी कोकण विभागीय मदत कक्षा चे उदघाटन दि.11 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वा. बचत भवन सी. बी.डी. बेलापूर येथे होणार आहे.उद्यापासून हा कक्ष सुरु करण्यात येणार आहे.
पुरवठा शाखेचे उपायुक्त श्री शिवाजी कादबाने यांच्या नेतृत्वाखाली प्रांत अधिकारी पनवेल दत्तात्रय नवले आणि तहसीलदार पनवेल अमित सानप, निवासी तहसीलदार संदीप चव्हाण हे काम पाहणार आहेत.उपायक्त महसूल सिद्धराम सालिमठ यांच्या नियंत्रणाखाली हा कक्ष सुरु राहणार आहे.हा कक्ष सी.बी.डी. बेलापूर येथील बचत भवन येथे कार्यरत राहील.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या वस्तू वाहनाने पाठवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी दिली आहे.
पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना मदत देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी विभागीय मदत कक्षामध्ये आपली वस्तू स्वरुपातील मदत जमा करावी, असे आवाहन श्री दौंड यांनी केले. आर्थिक मदत करावयाची असल्यास ती मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावी, असेही त्यांनी सांगितले.

पूरग्रस्तांसाठी मदत करु इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कार्यालयीन वेळेत या कक्षात वस्तू स्वरुपात मदत जमा करावयाची आहे. यामध्ये ब्लँकेट्स, सतरंजी, लहान मुलांचे कपडे, साड्या, टॉवेल, महिलांसाठी किट (साडी, परकर, टॉवेल, सॅनिटरी नॅपकीन इत्यादी) तसेच पुरुषांसाठी किट (टी-शर्ट, बर्मुडा, स्वेटर इत्यादी) लहान मुले व मुलींसाठी किट (टॉप, चड्ड्या, शॉर्टस, कानटोपी, स्वेटर) असे पोशाख स्वीकारले जातील. परंतु केवळ नवीन कपडे स्वीकारली जातील. जुने कपडे देऊ नयेत. याबरोबरच टिकाऊ अन्नपदार्थ यात बिस्कीटचे पुडे, सीलबंद खाण्याची पाकिटे, मॅगी, चहा पावडर, भडंग-मुरमुरे, ओआरएस, मेडीक्लोर, टूथपेस्ट-टूथब्रश, दंतमंजन, साबण, खोबरेल तेल, कंगवा, सॉक्स, स्लिपर, मिनरल वॉटर बॉटल, हेल्थ ड्रिंक, मेणबत्ती-काडीपेटी, मच्छर अगरबत्ती, पत्रावळी, टॉर्च अशा वस्तू स्वीकारल्या जातील. त्याचबरोबर साखर-मीठ, बेसन, गोडतेल, पीठ, तांदूळ, डाळी, कडधान्य अशा स्वरूपाचा किराणा माल देखील स्वीकारला जाईल, असेही श्री दौंड यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!