क्रिडा ठाणे

बियाथल नॅशनल चॅम्पिअनशिप स्पर्धेत ठाण्यातील सानिका वैद्य यशस्वी

ठाणे दि.27: स्वमग्न असलेल्या कु. सानिका वैद्य हिने मॉडर्न पेन्टॅथलॉन फेडेरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित केलेल्या दहाव्या बियाथल नॅशनल चॅम्पिअनशिप स्पर्धे मध्ये  दुसरा क्रमाक पटकवला आहे. हि स्पर्धा पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलनात १८ ऑगस्ट रविवारी रोजी पार पडली. विशेष मुलींच्या ग्रुप मध्ये सानिकाने दुसरा क्रमांक पटकावून रौप्य पदक जिंकले.

बियाथल ह्या स्पर्धेचे स्वरूप, २०० मीटर धावणे, ५० मीटर पोहणे व परत २०० मीटर धावून शर्यत पूर्ण करणे असे असते. अशा  विविध प्रकारच्या क्रिया एकावेळेस करणे हे स्वमग्न मुलांना कठीण जाते. तरीही यावर मात करून सानिकाने हि कामगिरी चोख बजावली. हे तिचे यश खरोखरच वाखाणण्या सारखे आहे.सानिकाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

मुंबई

error: Content is protected !!