ठाणे

शिवसेनेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे दुःखद निधन

डोंबिवली  : कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या शिवसेनेच्या माजी महापौर कल्याणी नितीन पाटील ( ४६ )यांचे आज दुपारी दीडच्या सुमारास निधन झाले. कल्याणी पाटील या २००५  आणि २०१०  आशा दोन वेळा नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या.२०१३  ते २०१५ या काळात त्या महापालिकेच्या शिवसेनेच्या महापौर म्हणून निवडून आल्या होत्या. पर्यावरण जागृतीसाठी त्यांनी सायकल स्पर्धा आयोजित केली होती. तसेच त्यांनी कुस्ती स्पर्धा पण आयोजित केल्या होत्या. त्यांच्या मागे विवाहित कन्या धनश्री ,मुलगा धनराज ,जावई ,नातवंडे असा परिवार आहे. सायंकाळी उशिरा विठ्ठलवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!