महाराष्ट्र

राज्यात आज १०१ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल

मुंबई, दि. 30 : विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात 63 मतदारसंघात 101 उमेदवारांनी 126 नामनिर्देशनपत्रे दाखल केली, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

यामध्ये जळगाव जिल्ह्यात दोन मतदारसंघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर बुलढाणा- एका मतदारसंघात 2 उमेदवार, वाशिम- एका मतदारसंघात 1 उमेदवार, अमरावती- चार मतदारसंघात 5 उमेदवार, वर्धा- एका मतदारसंघात एक उमेदवार, भंडारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, गोंदिया- एका मतदारसंघात एक उमेदवार, चंद्रपूर- एका मतदारसंघात एक उमेदवार, यवतमाळ- 2 मतदारसंघात 3 उमेदवार, नांदेड- 5 मतदारसंघात 15 उमेदवार, हिंगोली- एका मतदारसंघात एक उमेदवार, परभणी- 2 मतदारसंघात 6 उमेदवार, जालना- एका मतदारसंघात 2 उमेदवार, औरंगाबाद- 4 मतदारसंघात 8 उमेदवार, नाशिक- 3 मतदारसंघात 3 उमेदवार, पालघर- एका मतदारसंघात एक उमेदवार, ठाणे- एका मतदारसंघात एक उमेदवार, रायगड- एका मतदारसंघात 5 उमेदवार, पुणे- 7 मतदारसंघात 8 उमेदवार, अहमदनगर- 5 मतदारसंघात 9 उमेदवार, बीड- 4 मतदारसंघात 9 उमेदवार, लातूर- 3 मतदारसंघात 3 उमेदवार, उस्मानाबाद- एका मतदारसंघात एक उमेदवार, सोलापूर- 2 मतदारसंघात 2 उमेदवार, सातारा- एका मतदारसंघात एक उमेदवार, कोल्हापूर- 3 मतदारसंघात 3 उमेदवार आणि सांगली जिल्ह्यात 4 मतदारसंघात 6 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!