सिडकोने उरण तालुक्यातील वाहतूक सुरक्षा रक्षकांची सेवा पूर्ववत करण्यासाठीच्या प्रस्तावास दिली मंजूरी.
उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे आयात-निर्यात मोठया प्रमाणात वाढली आहे. यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करून अपघात होऊन बळी व जखमींचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला होता. यावर न्याय प्रस्थापित होण्याच्या उद्देशाने उरण सामाजिक संस्थेच्या वतीने मा. मुंबई उच्च न्यायालयात २०१७ रोजी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांच्या नावाने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर पहीली सुनावणीचे वेळी तत्कालीन सन्माननीय न्यायमुर्ती अभय ओक यांनी संबंधित विभाग जेएनपीटी, सिडको, एन एच ए आय, परिवहन विभाग, पि डब्ल्यू डी , वाहतूक नियंत्रण विभाग यांना या वस्तूस्थिती बद्दल सत्यप्रतीज्ञा पत्र ३० दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले होते. आणि याचिकेबदृदल बोलताना म्हणाले अशा आशयाच्या परिपूर्ण जनहित याचिका यायला पाहिजेत .
तरी उरण तालुक्यातील या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अनेक उपायांपैकी एक उपाय म्हणून सिडकोने २५ आणि जेएनपीटीने २५ सुरक्षा रक्षकांची नेमणूक दोन विभागात विभागून केली होती.
परंतु अचानक सिडको प्रशासनाकडे कोणीतरी आता वाहतूक कोंडी होत नसल्याचे कारण सांगून गेले २०१७ पासून कार्यरत २५ वाहतूक नियंत्रण करणारे सुरक्षा रक्षक कमी करण्यात आले होते. या सुरक्षा रक्षकांना पुन्हा पूर्ववत कामावर घेण्याची विनंती उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष काॅ भूषण पाटील आणि सरचिटणीस संतोष पवार यांनी सिडको प्रशासनाकडे केली होती. त्याच बरोबर नवीमुंबईचे वाहतूक विभागाचे डीसीपी काकडे यांनीही वस्तूस्थिती दर्शविणारे पत्र दिले होते.
उरणच्या वाढत्या औद्योगिकारणामुळे, तसेच वाढत्या शहरीकरणामुळे या भागात विविध ठिकाणी अचानक होणारी वाहतूक कोंडी व त्यामूळे होणार्या अपघातात जखमी होणार्या अपघात ग्रस्ताला त्वरित उपचार करण्यासाठी उरण तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटल नसल्या कारणाने अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत आणि लागत आहेत. याबाबत सविस्तर माहिती तत्कालीन सिडकोचे JMD कैलास शिंदे आणि सिडकोचे विद्यमान CVO सुरेश मेंगडे यांनी उरण सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकून घेतली आणि या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वाहतूक कोंडी आणि त्या कारणाने होणारे अपघात टाळण्यासाठी पुर्वी प्रमाणे वाहतूक नियंत्रणकरणार्या सुरक्षा रक्षकांची होते त्याच प्रमाणे नियुक्ती करण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने वरिष्ठ पातळीवर चर्चा करून घेतला आणि तसे वाहतूक नियंत्रण विभागाला आणि रायगड सुरक्षा रक्षक मंडळाला आदेशही दिले आहेत. त्याबद्दल सिडको प्रशासनाचे सन्माननीय चीफ व्हिजीलन्स ऑफिसर सुरेश मेंगडे यांचे उरण सामाजिक संस्थेच्या वतीने सरचिटणीस संतोष पवार यांनी एक रोप देऊन आभार व्यक्त केले.