उरण दि २० (विठ्ठल ममताबादे ) : मर्स्क या जागतिक कंपनीची वार्षिक सभा १४ मार्च २०२४ रोजी कोपणहेगन, डेंन्मार्क येथे संपन्न झाली.
या वार्षिक सभेसाठी NMGKS संघटनेचे कार्याध्यक्ष पि.के. रमण यांना मर्स्क स्टेअरिंग ग्रुपचे निमंत्रण होते.
GTI (मर्स्क )पोर्टमध्ये जे कंत्राटी कामगार कायमस्वरूपी काम करतात त्यांना कंपनीच्या कायमस्वरूपी कामगारांप्रमाणे पगार व सोई सुविधा मिळाल्या पाहिजे अशी मागणी मर्स्ककंपनीचे ग्लोबल हेड मिस्टर रुड व्हन डर वेल यांच्याकडे केली.
या मागणीवर ITF या बहुराष्ट्रीय संघाबरोबर चर्चा करण्यात आली व सकारात्मक तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. NMGKS संघटनेचे कार्याध्यक्ष पि. के. रमण यांनी केलेल्या मागणीला यश आले तर GTI पोर्ट मधील सर्व कंत्राटी कामगार कायमस्वरूपी होतील.
या मागणीमुळे GTI मधील कंत्राटी कामगारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.अशा प्रकारची मागणी करणारी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील NMGKS ही देशातील एकमेव संघटना आहे.