'संगम' या नाटकाचे पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न
मुंबई (शांताराम गुडेकर ) : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील मौजे असुर्डे गावातील श्री गणेश सेवा मंडळ पाताडेवाडी यांनी मुंबई गिरगाव येथील साहित्य संघ हॉलमध्ये 'संगम' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग उत्तम रित्या सादर केला.
तसेच 'संगम' या नाटकाचे पुस्तक प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामध्ये पार पडले.हे पुस्तक प्रकाशन उद्योजक जावेद खलिफे,पोलिस उपनिरिक्षक तमन्ना मिरेकर, पत्रकार सौ.मनस्वी महेंद्र मनवे,'संगम' या नाटकाच्या पुस्तकाचे लेखक सागर पालवकर तसेच दिग्दर्शक चंद्रकांत मांडवकर, गंगाराम गोताड,कलाकार स्वाती खापरे, तृप्ति नार्वेकर, रंजना महाब्दि यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील प्रमुख व्यक्ती गोपाळ मनवे,रमेश पाताडे, माजी उपसरपंच संतोष पाताडे, ग्रामपंचायत महिला सदस्य विजया पाताडे, सौ.समिता मनवे ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष मुंबई श्री.महेंद्र मनवे तसेच मंडळाचे पदाधिकारी तसेच व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले सर्वांचे लाडके जनतेच्या मनामनांत आदर्श असणारे व्यक्तिमहत्व असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,चिपळूण संगमेश्वर तालुका विधानसभा लोकप्रिय आमदार श्री.शेखर गोविंदराव निकम सर तसेच त्यांच्या अर्धांगिनी चिपळूण तालुका माजी सभापती / राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य उप प्रदेशाध्येक्षा सौ.पुजाताई शेखर निकम मॅडम काही कारणास्तव येऊ शकले नाही तरी सर्वांची मन जपत असताना त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांचे पुतणे सिद्धार्थ निकम व उद्योजक जावेद खलिफे यांना प्रत्येक्ष कार्यक्रमाला पाठवून कायम मंडळाच्या पाठीशी उभा आहे ही जाणीव करुन दिली. त्याबद्द्ल प्रमुख मान्यवरांचे तसेच निकम सरांचे आभार व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रुपेश मनवे यांनी केले. या अगोदर काही कार्यक्रमाला आमदार शेखर निकम यांनी रुपेश मनवे यांच्या पाठीवर शाब्बासकिची थाप मारून शुभेच्छा दिल्या होत्या ते सूत्रसंचालक कु.रुपेश मनवे त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मान्यवर,कलाकार देणगीदार रसिक मायबाप, हितचिंतक यांचे मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
'संगम' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग करण्यासाठी नाटकातील कलाकार विराज पाताडे, प्रविण पाताडे, विनेश मांडवकर, विजय पाताडे, प्रकाश पाताडे,रविंद्र भातडे, रंजना महाब्दि जेष्ठ कलाकार ज्यांनी या कलेमध्ये कला सादर करत असताना कलाकार घडविले ते म्हणजे तानाजी घडशी आणि कृष्णा घडशी यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य करून 'संगम'या नाटकाच्या माध्यमातून एक चांगला संदेश दिला.तसेच चांगल्या प्रकारे सर्वांनी आपली कला सादर उत्तम रीत्या प्रयोग सादर केला.त्याबद्दल गावातील रहिवाशी, मुंबईकर चाकरमानी आणि नाट्य रसिक यांच्याकडून आयोजक आणि कलाकार यांचे कौतुक करण्यात आले.