डोंबिवली ( शंकर जाधव ) : खडवली येथील भातसा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या हॉटेल व धब्याला दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली.
आगीमुळे पर्यटकांची मोठी प्रमाणा तारंबळ उडल्याने जीव वाचवण्यासाठी धावपळ झाल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणची माहिती अग्निशामक दलाला मिळाली नसल्याने परिसरात असलेल्या गावकऱ्यांनीच नदीचे पाणी मारून आगे वरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला मात्र उन्हाळ्याचे दिवस असल्याने जोराचा वारा वाहत असल्याने आगी वरती नियंत्रण मिळवणे कठीण होत होते अखेर काही लोकांनी याची माहिती अग्निशामक दलाला दिली. आगे वरती संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आला.