डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवजयंती निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने डोंबिवली पूर्वेकडे भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्यास अभिवादन करत पुष्पहार अर्पण करुन मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर, माजी नगरसेवक तात्या माने,सतीश मोडक, जोशी, कुणाल ढापरे, राजेंद्र नांदोस्कर, कविता गावंड, वैशाली दरेकर, मंगला सुळे, शिवराम, निरंजन भोसले, जगदीश ठाकुर, प्रशांत शिंदे, राजेश शिंदे, नंदू धुळे - मालवणकर यांसह अनेक जण सहभागी झाले होते.