दिवा : कल्याण लोकसभेत भाजप च्या कमळ चिन्हाशिवाय उमेदवार निवडून येऊ शकत नाही अशी फुशारकी दिवा भाजप पदाधिकारी मारत आहेत. लोकसभा क्षेत्राचे गणित सांगण्यापेक्षा आणि माध्यमांमध्ये बातम्या तयार करण्यापेक्षा दिवा भाजपनं दिवा शहरात आपलं नीट मूल्यमापन करावं असे अँड.आदेश भगत यांनी म्हटलं आहे.
वास्तविक खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा कामाचा आवाका आणि प्रचंड जनसंपर्क लक्षात घेता त्यांच्या तोडीस कोणत्याही पक्षाकडे सांगायला उमेदवार शिल्लक नाही. मागील लोकसभा निवडणुकीत दोन लाखाच्या फरकाने जिंकणारे डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी महाराष्ट्रात सर्वात विक्रमी मताने जिकणारे उमेदवार असतील यात शंका नाही. दिवा शहरात कुणी कितीही आदल-आपट केली तरीही दिवा शहरातून पडलेल्या एकूण मतदानाच्या ८०% पेक्षा जास्त मतदान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना म्हणजेच 'धनुष्यबाण' या चिन्हाला मिळेल असा आत्मविश्वास आम्हाला असल्याचे अँड.आदेश भगत यांनी म्हटले आहे.