ठाणे, दि २४ ( विनोद वास्कर ) : आधुनिक काळाच्या ओघात सर्व सणांचे रूप पालटत असले तरी ठाणे तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण खेड्या पाड्यात शिळ, देसाई पाटील पाडा, देसाई वेताळ पाडा, देसाई तळेपाडा, मोठी देसाई, देसाई वेताळ पाडा, खार्डी, फडके पाडा, डायघर, पडले, खिडकाळी, गोठेघर उत्तर शिव, नागांव, दहिसर मोरी, भंडाली ,पिंपरी, मोकाशी पाडा, दहिसर, नेवाळी, निघु, बामाळी, नारिवली, बाळे, वाकळण, आदी विविध भागात मात्र आजही पारंपारिक पद्धतीनेच सण साजरे करण्यात आले.
या गावात एक गाव एक होळीची परंपरा आजही अबांधित ठेवली आहे. याउलट शहरी भागात गल्ली -गल्लीत प्रत्येक सोसायटी, नगरात छोट्या मोठ्या थोड्या होळ्या पेटवून नंतर धुळवडीचे रंग उधळले जातात. मात्र ग्रामीण भागात आधुनिक युगामध्ये ही एक गाव एक होळी अशी वर्षानुवर्षाची परंपरा आजही सुरू आहे. पहिले तीन दिवस छोट्या होळया, चौथ्या दिवशी चोरटी होळी आणि शेवटच्या म्हणजे २४ मार्चला पाचव्या दिवशी मोठी होळी असा पाच दिवस होळीचा सण साजरा केला जातो. या पाच दिवसात लहान मुले वाजवत असलेल्या डफयांच्या ( डफली ) आवाज आजीही शिमग्याच्या पारंपारिकतेची ग्वाई देत आहे. चोरटी होळीसाठी तरुण गावातून लाकडे चोरून आणतात. पाचव्या दिवशी सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने मोठी होळी रचली जाते. या होळीची पारंपारिक पद्धतीने पूजा केली जाते. गावातील नवविवाहित जोडप्यांनी या होळीभोवती पाच फेऱ्या मारण्याची पद्धत आहे. त्यानंतर होळी पेटवली जाते. होळी भाजलेल्या नारळाचा प्रसाद घेण्यासाठी सर्वांचीच झुंबड उडत असते. साखरेच्या पाकापासून तयार केलेले हार लहान मुले होळीच्या दिवशी गळ्यात घालत असतात. दरवर्षी ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या जागेला होळीची माळ किंवा मैदान असे म्हणतात. याच माळावर पाच दिवस विविध खेळ, गरबा नृत्य म्हणून मनोरंजनात्मक कार्यक्रम होतात. तर ग्रामीण खेड्यापाड्यांवर तारपा नृत्य, ढोलनाच, लेझीम, व सामूहिक गरबानृत्य, कुस्त्या, कबड्डी, क्रिकेट, असे विविध कार्यक्रम रात्रभर खेळले जातात. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी घरोघरी पुरणपोळ्या केल्या जातात. धुलीवंदनाला मनसोक्त धुळवड खेळली जाते. रंगपंचमीला गावात झाडा फुलांपासून तयार केलेले नैसर्गिक रंगत वापरले जातात.
ठाणे तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणजे ठाणे कल्याण, पनवेल, मुंब्रा, शहर तसे गावागावात आठवड्या बाजार भरतात. परंतु सणाकरीता ठाणे शहरातून खरेदी करण्याची एक वेगळीच प्रथाच आहे .त्यानुसार होळीसाठी सधस्थितीत ठाणा शहर बाजार फुललेला आहे आजूबाजूच्या खेड्यावरील आदिवासी चार दिवस अगोदर खरेदी करत असून पोस्ट मागण्या करता कुणी पुरुष महिलेच्या वेशात, त्तर कोणी महिला पुरुषांच्या वेसात, तर कोणी तोंडाला अंगाला रंग लावून वेगळा पेहराव करून फुटलेल्या पत्रांचा डबा वाजवत, तोंडाला मुकटे लावून, घराघरातून व दुकानदाराकडून पोस्ट मागत आहे. हाच प्रकार धुलीवडी पर्यंत चालत असतो. तर ठाणे शहर बाजारात हारगाठ्या, काकणे, नारळ, रंग, पिचकाराऱ्या यांची खरेदी मोठ्या जोरात होते. आगरी कोळी समाजाकडून कडून होळीची परंपरा जपली जात आहे. होळी हा सण सर्वांसाठी खूप महत्त्वाचा व आनंदायी असून या सणाची तयारी घराघरातून होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर खेड्यापाड्यातील आगरी कोळी, आदिवासी आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या रितीरिवाज व परंपरेनुसार हा सण साजरा करण्यात मग्न असल्याचे चित्र सध्या ठाणे तालुक्यात व परिसरात पाहावयास मिळत आहे. पोळ्या,पापड्या, करंज्या, अशा गोड धोंडचा सण आयनाचे बयना घेतल्या बिगर जायना म्हणत पोस्ट मांगाचा सण, तहान भूक रंगात रंगून जायाचा सण आणि दुष्ट विचार होळीत दहन करण्याचा सण. होळीचा सण म्हणजे लाने गो झांजुराचे हवलाय झांजुराचे, आमचे दाराशी हाय शिमगा, जोय जोय जा अरे जोर जा, हावलु बाय हावलु बाय तुझ्या गावाचं नाव काय, सण आयलाय गो आयलाय गो, चला चला जाऊ हावलु मालाला अशा पारंपारिक गीतांवर देहभान विसरून नाच गाण्याचा सण, नव दामपत्यांच्या मान - पानाचा सण, होळी हा सण आनंदोत्सवात साजरा करून गावात सांप्रदायिक एकता व एकात्मता वृद्धिगत होते. गावातील लहान थोर भेदभाव विसरून एकत्र येतात त्यामुळे शांती - सलोखा प्रस्थापित होण्यास मदत होते. त्याचबरोबर येथील ग्राम संस्कृती, लोककला, लोक परंपरा ही जपली जाते, जोपासली जाते असे असले तरीही पूर्वीसारखा उत्साह आज पहावयास मिळत नसल्याची खंत येथील जुने -जानते ग्रामस्थ व्यक्त करतात.
शहरीकरणात सर्वच गोष्टींवर निर्बंध आल्याने आज हा संण पूर्वीसारखा मनाजोगा साजरा करता येत नाही. आंबा, जाभुळ, काटे, सावरीची मोठ मोठी झाडे होळीसाठी वापरली जातात.
संलग्न छायाचित्रे :