भिवंडी ( प्रतिनिधी अवधुत सावंत ) : विशेष कृती दल तसेच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सापळा रचून काल दिनांक २५/०४/२०२४ रोजी १९:३० ते २३:०० दरम्यान हॉटेल के.एन. पार्क, कोनगाव, भिवंडी येथे छत्तीसगड येथील ०३ पुरूष आरोपी यांना आएपीएल मॅचवर सट्टा लावून जुगार खेळत असताना पकडले. सदर आरोपी यांनी आपसात संगनमत करून लॅपटॉप मध्ये 'सुभलाभ' नावाचे सॉफ्टवेअर मध्ये क्रीकेट मॅचवर जुगार/बेटिंग/सट्टा खेळणाऱ्या व्यक्तीकडून घेतलेल्या सट्ट्याच्या बेटींगची माहिती भरून रियलमी पॅड टॅब मध्ये 'ताज७७७स्पोर्ट' ऍप्लीकेशन वर 'आरसीबी' व 'सनरायझर्स हैद्राबाद' यांच्यामधील टी-२० मॅच लाईव्ह बघून, सट्टा लावणाऱ्या इतर इसमाकडून ११,८६,८११/- रूपयाची सट्टा/बेटिंग स्विकारली. तसेच 'रेड मी ९' कंपनीच्या मोबाईल मध्ये 'सुपर असिस्टंट' ऍप्लीकेशन मध्ये बुकी जानू, राहणार कोरबा, छत्तीसगड यांची १९ नंबरची बुकीची बेटींग लाईन घेवून तिच्यावर ७,०३,०००/रूपयांचा जुगार/सट्टा/बेटिंग लावले.
तसेच जुगार/सट्टा/बेटिंग खेळण्याकरीता शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्राचे आधारे सिमकार्ड घेवून शासनाची व मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली आहे. सदर ०३ इसमांच्या ताब्यातून १२ मोबाईल फोन, ०१ टॅब व ०१ लॅपटॉप असे एकूण ०१,९७,४००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. म्हणून वरील नमूद ०३ इसम तसेच पाहिजे आरोपी जानू राहणार: कोरबा, छत्तीसगड यांच्याविरूद्ध कोनगाव पोलीस स्टेशन येथे आज दिनांक २६/०४/२०२४ रोजी गु.रजि.क्र.५६१/२४ भा. दं.वि. कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१,३४ सह महा. जुगार प्रतिबंधक कायदा कलम ०४ व ०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यात तीन्ही आरोपींना अटक केली आहे. ते छत्तीसगडहून येथे येवून आयपीएल मॅचवर सट्टा लावत असत. त्यांची नावे खालीलप्रमाणे
१) शानू ललित बेरीवाल, (वय: ३१ वर्षे) व्यवसाय: ट्रॅव्हल्स, जिल्हा: रायगड, छत्तीसगड, २) रजत बाबूलाल शर्मा, (वय: ३० वर्षे), जिल्हा: रायगड, छत्तीसगड ३) विजय सिताराम देवगन, (वय: ४० वर्षे), रा. जिल्हा रायगड, छत्तीसगड अशी आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त,(गुन्हे), पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), शिवराज पाटील, मा. सहायक पोलीस आयुक्त, राजकुमार डोंगरे, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे शहर, सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पोनि. वनिता पाटील, सपोनि. श्रीकृष्ण गोरे, भुषण कापडणीस, सुनिल तारमळे, पोउनि. विजयकुमार राठोड, सपोउनि. सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, संजय बाबर, पोहवा. सचिन शिंपी, योगीराज कानडे, संजय राठोड, गणेश गुरसाळी, मपोहवा. शितल पावसकर, मपोशि. मयुरी भोसले, पोशि. तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, विनोद ढाकणे चापोना. भगवान हिवरे यांनी यशस्वीपणे केली आहे.