दिवा ( विनोद वास्कर ) : ०१ एप्रिल २०२४ रोजी दिव्यात भरधाव रिक्षाच्या धडकेत ७० वर्षीय वृद्धांचा बळी गेल्याची घटना घडली आहे. दिवा स्टेशनच्या मुख्य रस्त्यावर दुपारी साडेतीन वाजता श्यामनारायण गुप्ता ( वय ७० ) हे मॉडर्न किचन हॉटेल समोरून रस्त्यावर जात असताना दिवा स्टेशन कडून आगासन फाटक कडे जाणारी रिक्षा क्रमांक एम. एच. ०४ एच. झेड. ०१६४ ने जोरदार धडक दिलाने गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाले असता त्याला मुंब्रा येथील काळसेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रसंगी परिस्थिती नाजूक झाल्याने गुप्ता यांना के.ई.एम हॉस्पिटल मुंबई येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांच निधन झाले असून. या प्रकरणी मयत गुप्ता यांचा मुलगा अविनाश गुप्ता यांनी आरोपी विरुद्ध परळ भोईवाडा येथे पोलीस तक्रार केली असून प्रकरण मुंब्रा पोलिसात वर्ग करण्यात आला आहे.
मनसेने केला नाकर्त्या वाहतूक पोलीस प्रशासनाचा निषेधभरधाव रिक्षाच्या धडकेत आज अखेर एका वृद्ध नागरिकाचा बळी गेला. स्टेशन परिसरातील होणारी वाहतूक कोंडी, रिक्षावाल्यांचा मुजोरपणा, रस्ता अडवून उभे राहणारे आणि बेदकारपणे रिक्षा चालवणारे रिक्षा चालक यांच्याबाबत अनेकदा वाहतूक पोलिसाकडे पाठपुरावा करूनही प्रशासनाने कधीच यावर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही. आज त्याचाच परिपाक म्हणून एका निष्पाप नागरिकाला आपला जीव गमावला लागला. प्रशासनाकडून दिव्याकडे फक्त ओरबडण्याच्या दृष्टीने बघितले जातं, बाकी इथली लोक जगो किंवा मरो याच्याशी कोणाला काही देणे घेणे नाही.असे मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी म्हटले आहे.