ठाणे ( विनोद वास्कर ) : भूमिकन्या व भूमिपुत्र सामाजिक सेवा संस्था ठाणे उपाध्यक्षपदी शशी गंगाधर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्र अध्यक्षांच्या हस्ते देण्यात आले.
भूमिकन्या व भूमिपुत्र सामाजिक सेवा संस्था ठाणे यांनी अखेर डायघर गावचे शशी गंगाधर पाटील यांच्या कार्याची दखल घेतली आहे. ठाणे पंचक्रोशीत कोणताही सामाजिक धार्मिक कार्य असो त्याच्यामध्ये सर्वात पुढे त्यांचा पुढाकार असतो, गोरगरिबांना न्याय देणे, विद्यार्थ्यांना मदत करणे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनामध्ये सहभागी होणे, तसेच वारकरी संप्रदाय मध्ये सुद्धा ते कार्य करत आहेत. तसेच टोरंट विद्युत कंपनीच्या विरोधात सुद्धा लढा दिला आहे. एवढेच नाही तर ९ दिवस जल ची हवा सुद्धा त्यांनी खाल्ली आहे.आगरी समाज सामुदायिक विवाह सोहळा,आगरी कोळी वारकरी समाज भवन, लोक नेते,दि.बा.पाटील, सर्व पक्षीय युवा मोर्चा ५४ दिवस आंदोलन मध्ये सहभागी होते.डायघर ड्रम्पिंग ग्राउंड आंदोलन मध्ये सुद्धा सहभागी होते.
सर्व गोष्टीची दखल घेत भूमिकन्या व भुमिपूत्र सामाजिक सेवा संस्था ठाणे यांनी शशी पाटील यांना उपाध्यक्ष या पदावर नियुक्ती केली आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. उपाध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल डायघर गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.