कल्याण (संजय कांबळे) : कल्याण पश्चिमेकडील कल्याण न्यायालयाला लागून असलेला महात्मा जोतिबा फुले यांचा अर्धपुतळा सध्या अनाधिकृत पे अँड पार्किंगचे ठिकाण बनले असून यामुळे हा समाजसुधारक, राष्ट्रपुरुषांचा अपमान नाही कां,म फुले चा पुतळा परिसर बनला अनाधिकृत पार्किंग चे ठिकाण, अशा मथळ्याखाली विविध दैनिकातून बातमी प्रसिद्ध होताच कल्याण डोंबिवली महानगरपालिका व शहर वाहतूक शाखा यांनी तातडीने कारवाई करून येथील पार्किंग हटविले व हा परिसर मोकळा केला, त्यामुळे विविध सामाजिक संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, यांनी पत्रकार कांबळे व प्रशासनाचे आभार मानले.
दोनच दिवसापूर्वी पत्रकार कांबळे यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या अर्धपुतळा परिसराची बातमी सचित्र प्रसिद्ध केली होती. सांय दैनिक, लोकदिशा, दैनिक, सागर, दैनिक महानगरी टाईम्स, तूफान क्रांती, जीवनदिप वार्ता, आदी विविध दैनिकामधून हे वृत्त प्रसिद्ध होताच, कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त ,कल्याण शहर वाहतूक शाखा, यांनी कारवाई करून हा परिसर पार्किंग मुक्त केला,
श्री सावता माळी मंडळ कल्याण या संस्थेने इ स१९६३साली कल्याण मुरबाड रोड च्या बाजूला व न्यायालयाला लागून महात्मा जोतिबा फुले यांचा अर्धपुतळा उभारुन पुढील सुव्यवस्थेसाठी कल्याण नगरपालिकेच्या स्वाधीन केला.या पुतळ्याचे अनावरण कृष्णराव धुळूप, विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा यांच्या हस्ते तर के ,टी, गिरमे, उपसभापती, विधानसभा , महाराष्ट्र राज्य, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले होते.पुतळयाची प्रतिष्ठापना नामदेव आहेर, अध्यक्ष, कल्याण नगरपालिका परिषद, यांच्या हस्ते १९७४मध्ये करण्यात आली आणि वरील मेघडंबरीचे काम तत्कालीन नगरसेवक कै प्रकाश पेणकर यांच्या निधीतून केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे समोर कल्याण न्यायालयाला लागूनच महात्मा जोतिबा फुले यांचा अर्धपुतळा बसविण्यात आले आहे
, सध्या या परिसरात मोठ्या प्रमाणात कामे सुरू असल्याने वाहतूक कोंडी चे तीनतेरा वाजलेले असतात, लोकांना चालणे मुश्कील होऊन जाते.
विशेष म्हणजे, कल्याण डोंबिवली महापालिकेने नुकतेच बांधलेल्या सुसज्ज अशा कै दिलीप कपोते,पे अँड पार्किंग वाहनतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हस्ते झाले होते,ते सुरू देखील झाले असताना महात्मा फुले यांच्या पुतळ्याशेजारी रस्त्यावर पार्किंग कशासाठी?असा सवाल उपस्थित केला जात आहे.महात्मा फुले चौकात इतकी वाहने पार्किंग केली आहेत की येथे पुतळा आहे हेच कळत नाही, दिसत नाही.
महात्मा जोतिबा फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारी कार्य केले, समाजसुधारकामध्ये ते देशात अग्रस्थानी असून, त्यांच्या पुतळ्यामुळे नवीन पिढीला प्रेरणा, उर्जा, शक्ती, दिशा मिळत असताना आणि त्याहीपेक्षा दोनतीन दिवसावर त्यांची 'जंयती,उत्सव आला असताना त्यांच्या पुतळ्याला अशा अनाधिकृत पार्किंग चा वेढा पडला आहे हा त्यांचा अपमान नाही का? याकडे महानगरपालिका प्रशासन, वाहतूक पोलीस, आणि स्वतः ला या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणवून घेणारे यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. अशा प्रकारे बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेण्यात आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले तसेच प्रशासणाचे आभार देखील मानले.