ठाणे, दिवा ता ७ एप्रिल ( संतोष पडवळ - प्रतिनिधी ) : सन २०२१ मध्ये दिवा शहरा जवळील म्हातर्डी गाव येथे घरामध्ये खेळायला आलेल्या एका ४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशन गुन्हा रजि. क्र. २४/२०२१ पोक्सो व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मा. जिल्हा व विशेष सत्र न्यायालय ठाणे यांनी आरोपीस दोषी धरून २० वर्ष सश्रम कारावास व द्रव्यदंड अशी शिक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये सुनावली आहे.
सदर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपासामुळे दोषसिद्धी बाबत मा. पोलीस आयुक्त, ठाणे श्री. आशुतोष डुंबरे यांच्या हस्ते सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी शेळके यांना दि. ६ एप्रिल २०२४ रोजी उत्कृष्ट तपास प्रमाणपत्र देवून गौरव व सत्कार करण्यात आला. प्रसंगी दिवा शहरातील अनेकांनी सपोनि शहाजी शेळके यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.