डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण लोकसभा मतदार संघातुन महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांची सोमवार 15 तारखेला डोंबिवलीतील शिवसेना ( ठाकरे गट ) च्या शाखेत आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी वैशाली दरेकर यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्याबद्दल कौतुक करत आम्ही तुमच्या सोबत असून जोरदार प्रचार करू असे आश्वासन दिले. यावेळी उमेदवार दरेकर यांनी आपच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.