Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

ठाणे विधानसभा मतदारसंघात नियुक्त विविध पथकांनी दक्ष रहावे - सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील



 

ठाणे,  - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत असलेल्या 148 ठाणे विधानसभा मतदारसंघांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या विविध पथकांच्या कामकाजाचा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांनी आढावा घेऊन सर्व पथकांना दक्षतेच्या सूचना केल्या.


यावेळी अतिरिक्त सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार डॉ. आसावरी संसारे उपस्थित होत्या. यावेळी 148 ठाणे विधानसभा मतदारसंघांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या आचारसंहिता विषयक नऊ भरारी पथके,नऊ स्थिर सर्वेक्षण पथके, चार व्हिडिओ सर्वेक्षण पथकेदोन व्हिडिओ पाहणी पथकांमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कामकाजाचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला. या मतदारसंघात माजिवडा नाका, बाळकुम नाका व साकेत नाका  या तीन ठिकाणी कार्यान्वित होणाऱ्या स्थिर सर्वेक्षण पथकांनही दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या. आचारसंहिता विषयक पथके, एक खिडकी पथक व लेखा विषयक यांनी समन्वय साधून कशा प्रकारे काम केले पाहिजेस्थिर सर्वेक्षण पथकाने कशा प्रकारे काम करावे याचेही सूक्ष्म मार्गदर्शन करण्यात आल. तसेच मतदारसंघातर्गत सहा पोलिस ठाणे यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना यांनादेखील कायदा व सुव्यवस्था बाबत जागरूक राहण्याच्या सूचना दिल्या.


आचारसंहितेचे योग्य रीतीने पालन व्हावे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधींना विहित मुदतीत एक खिडकी द्वारे तत्काळ परवाने मिळावेत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश श्रीमती पाटील यांनी यावेळी दिल्या. स्ट्रॉंग रुम सुरक्षे बाबत योग्य ती दक्षता घेण्याविषयीही त्यांनी संबंधितांना निर्देश दिले.


त्याचप्रमाणे उपस्थित राजकीय पक्षाचे प्रतिनिधींना देखील निवडणूक विषयक सुरू असलेल्या कामकाजाची माहिती देण्यात आली. विविध परवानग्या तत्काळ मिळण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती सविस्तर सांगण्यात आली . त्याच प्रमाणे 26 एप्रिल 2024 रोजी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना पालन करावयाच्या नियमाविषयी देखील विस्तृत चर्चा करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |