भिवंडी ( प्रतिनिधी मिलिंद जाधव ) : महामानवांचा विचारांचा रथ पुढे नेण्यासाठी, वारसा जपण्यासाठी, त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी, भिवंडी तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर कुरुंद येथे दिनांक २५ एप्रिल २०२४ रोजी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कुरुंद ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली केदार यांच्या हस्ते तर उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. यावेळी , सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय तर विविध क्षेत्रातील मान्यवरांना संविधानाची प्रास्ताविक फ्रेम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी रॉकस्टार सुप्रसिद्ध गायक राहुल साठे यांनी विविध प्रबोधनात्मक भीम गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली व उपस्थितांची मने जिंकली. सदर भीम गीतांच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी प्रतीक पवार यांनी केले.