डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील माजी नगरसेवक रणजित जोशी यांच्या पुढाकाराने जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत देवी चौक येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालाचे वाटप करण्यात आले.
यावेळी एका जेष्ठ नागरिकांने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे मोठ्या मताधिक्याने तिसऱ्यांदा निवडून येतील असा विश्वास पत्रकारांशी बोलताना व्यक्ती केला. माजी नगरसेवक रणजित जोशी यांच्या वाढदिवसाला आलेल्या जेष्ठ नागरिकांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रकाशित केलेल्या कार्यअहवालचे वाटप करण्यात आले. डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर येथील जेष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी माजी नगरसेविका वृषाली जोशी यांसह परिसरातील नागरीक उपस्थित होते.माजी नगरसेवक रणजित जोशी हे ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्राची सहलाही घडवून आणतात.
यावेळी वाढदिवस निमित्ताने स्त्री-पुरुष जेष्ठ नागरिकांनी गणपती अथर्वशीर्ष, मारुतीस्तोत्र पठण तसेच श्रीराम जयराम जयजय राम असा जयघोष केल्याने वातावरणात वेगळेपण आले होते. यावेळी जोशी यांनी प्रभागातील तसेच शहरातील विकास कामांबाबत उपस्थित लोकांना माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढदिवसाबद्दल जोशी यांना पाठविलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त सर्वांनी मिष्ठान्न भोजनाचा आनंद घेतला.