पुणे : - महाराष्ट्र साहित्य परिषद येरवडा-विश्रांतवाडी, पुणे शाखेच्या वतीने कवी, लेखक,सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त येरवडा, पुणे येथे कवी संमेलनाचे आयोजन केले होते तसेच वाढदिवसाचा खर्च टाळून स्नेहछाया या सामाजिक संस्थेतील उपेक्षित, वंचित मुलांना आर्थिक मदत केली.
कवी संमेलनात सहभागी कवींनी विविध विषयावर बहारदार कविता सादर करून कवी संमेलनात रंगत आणली. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. विजय लोंढे यांनी केले होते. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद येरवडा शाखेच्या अध्यक्ष प्रा. रुपाली अवचरे जेष्ठ बाल कवी बाळकृष्ण बाचल, कृष्णा मोहिते,विजय कांबळे, सिद्धार्थ वंजारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कवी संमेलनात किरण तायडे यांनी
"चितेखाली राख नसू दे,
आयुष्य मोजणारं माप नसू दे,
पाठीवर कुणाची थाप नसू दे,
पण आयुष्याला पुरणारा बाप असू "
ही कविता सादर केली.
कवी रमेश यांनी आईच्या हळव्या प्रेमावर
तुझ्याविना सारं सून सून वाटते
आठवणीची गर्दी मनी दाटते
होतो मी तुझा लाडका
झालो मी आता पोरका
जपून ठेवल्यात तुझ्या अस्तित्वाच्या खुणा
आठवण येते आई तुझी पुन्हा पुन्हा
हि हृदयस्पर्शी कविता सादर केली. तसेच माया बंगरगी यांनी रक्षा बंधनादिनी डोळयात, माझ्या साचले पाणी हिंसाचाराची बंदूक घेवूनी, फिरती बंधू रानीवनी हि कविता सादर केली.
या कवी संमेलनात बाळकृष्ण बाचल,प्रा. रुपाली अवचरे,सीताराम नरके,असित मेश्राम,वर्षा सडकर,अरुण कटारे, डॉ. मिलिंद शेडे,रमेश जाधव, माया बंगरगी,राहुल भोसले या कवींनी कविता सादर केली..