ठाणे (विनोद वास्कर ) : मनाशी पक्क ठरवले तर काहीही अशक्य नाही. परिस्थिती शिक्षणाच्या आड येत नाही याचे उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील आणि दिवा शहरालगत असलेल्या फडकेपाडा गावातील रिक्षा चालकाची कन्या कु. वेदश्री यशवंत पाटील हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले आहे. वैद्यकीय शिक्षण चांगल्या गुणांनी पूर्ण केल्यानंतर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कुटुंबाच्या चरितार्थासाठी दिवा ते शिळफाटा रिक्षा चालवणारे यशवंत गंगाराम पाटील यांची डॉ.कु. वेदश्री यशवंत पाटील हिने नुकतीच बीएचएमएस पदवी प्राप्त केले आहे. यामुळे गावाने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. माजी. नगरसेवक हिरा पाटील, माजी नगरसेवक बाबाजी पाटील, आमदार राजू पाटील, उपमहापौर रमाकांत मढवी , कल्याण ग्रामीण खासदार, श्रीकांत शिंदे, माजी आमदार सुभाष भोईर, युवा सेना अधिकारी सुमित भोईर, शिवसेना पदाधिकारी काळुराम पाटील, दत्तू म्हात्रे, वैभव आलिमकर, चंद्रकांत आलिमकर, रमेश काठे, मनसे पदाधिकारी शरद पाटील, दिनेश पाटील, हे सर्वजण डॉ. वेदश्री पाटील हिचा सत्कार करण्यासाठी तिच्या निवासस्थानी जाणार असल्याची चर्चा गावामध्ये आहे. या सर्वांनी तिला मोबाईल वरून फोन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच फडकेपाडा गावातील ग्रामस्थांनी चौका चौकामध्ये शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी देण्याचे बॅनर लावण्यात आले आहे. पहिल्यांदाच फडके पाडा गावात महिला डॉक्टर झाली आहे. त्यामुळे आम्हा ग्रामस्थांना खूपच आनंद झाला आहे असे ग्रामस्थ म्हणाले.
लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या वेदश्री ने डॉक्टर म्हणून रुग्णांची सेवा करण्याचे ध्येय मनाशी बाळगले यासाठी अभ्यासाची तयारी तिने ठेवली.
१ ली ते ४ थी - ठाणे महानगर पालिका शाळा क्र. ८४ फडकेपाडा,५ वी ते ७ वी - ठाणे महानगर पालिका शाळा क्र . ८१ शिळगाव, ८ वी ते १० वी. हाशा रामा पाटील माध्यमिक विद्यालय शिळगांव, ११ वी ते १२ वी.बी.एन बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्स
पदवी शिक्षण घेतले.श्रीमती कांचनबाई बाबुलालजी अबड होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज चांदवड. (MUHS नाशिक) येथे तिने पूर्ण केले.
हाशा रामा पाटील विद्यालय मध्ये शिक्षण घेत असताना, तिथूनच तिला वैद्यकीय शिक्षणाची गोडी निर्माण झाली. स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज श्रीगोंडा येथे तिला बीएचएमएससाठी प्रवेश मिळाला. वैद्यकीय च्या सर्व वर्षाचे शिक्षण तिने यशस्वीरित्या पूर्ण करून डॉक्टर होण्याची स्वप्न साकार केले.
मुलगी डॉक्टर झाल्याने आई-वडील व कुटुंबांना आनंदाला उधान आले आहे. वडिलांनी मुलीच्या कष्ट व परिश्रमाची चीज झाले. माझी मेहनत फळाला आली असे मत व्यक्त केले.
वेदश्री ने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत विविध अडीअडचणीवर मात करून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले ही गावासाठी अभिमानास्पद बाब आह। अन्य तरुणांनी तिचा आदर घ्यावा. परिस्थितीवर मात केल्यास दगडालाही पाझर फुटतो हे तिने अभ्यासातून सिद्ध केले. ग्रामस्था तर्फे तिचा सत्कार केल्याने अन्य तरुणींनाही त्यापासून प्रोत्साहन मिळेल हा हेतू आहे. असे तिचे वडील यशवंत गंगाराम पाटील, आई सुलोचना यशवंत पाटील यांनी शहरनामा शी बोलताना सांगितले .