हडपसर, ता. २७ : मध्यप्रदेशातील भारतीय कलाकार संघाने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात येथील भागूजी शिखरे यांच्या 'द लॉर्ड कृष्णा' या चित्राची प्रेक्षकांना भूरळ पडली. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातून निवड झालेले हे एकमेव चित्र आहे.
चित्रकार शिखरे यांनी ॲक्रेलिक रंगाच्या माध्यमातून ३ बाय ४ फूट आकाराचे हे चित्र रेखाटले आहे. कृष्णाच्या व्यक्तीमत्वाला साजेशी रंगसंगती केली आहे. चित्राची पोजही इतर कृष्ण चित्रा पेक्षा वेगळी आहे. त्यामुळे या चित्राचे प्रदर्शनात मोठे कौतुक झाले. शिखरे हे एका माध्यमिक विद्यालयातून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना यापूर्वी राज्यस्तरीय, राष्ट्रीय 'आदर्श कलाशिक्षक पुरस्कार' मिळाले आहेत.