Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

श्री एकविरा देवी पालखी सोहळा परंपरेनुसार व्हावा ! लवकरच संयुक्त बैठक होणार !

               

एकविरा भक्त जयेंद्रदादा खुणे यांनी किशोर घुमाळ ( लोणावळा व.पो.नि) यांची भेट घेऊन केली चर्चा

ठाणे : विनोद वास्कर दि.०२,वेहेरगाव (लोणावळा) : आगरी,कोळी,सिकेपी, तेली, माळी, कुणबी, कराडी व इतर भाविकांसह राज्यातील लाखो भाविकांचे जागृत श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध वेहेरगाव कार्ला गडावर आई एकविरा देवीची यात्रा व पालखी सोहळा चैत्र सप्तमी सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी होत आहे. या अनुषंगाने श्री एकविरा भक्त भाविक मंडळ व आगरी सेना मुंबई प्रदेश अध्यक्ष जयेंद्रदादा खुणे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ साहेब यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली.


श्री एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. आईचा पालखी सोहळा परंपरेनुसार व्हावा. यासाठी सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी पालखीचा मुख्य दिवस असल्याने दिनांक १४ ते १६ एप्रिल २०२४ या तीन दिवशी देवीची यात्रा असते. एकविरा आईच्या नावाने आई माऊलीचा उदो....ऊदो, आये..आयलू...चा जयघोष करत देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक देवीचे व पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. ढोल , ताशा व बँडच्या तालावर यात्रेत भाविकांच्या उत्साहाला उधाण आले असते. देवघर येथील कालभैरवनाथ देवाच्या पालखी सोहळ्याने एकविरा आईच्या यात्रेस सुरुवात होते. मुंबई, ठाणे,रायगड कोकणासह राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर जयेंद्रदादा खुणे यांनी लोणावळा वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ साहेब यांच्याशी चर्चा करताना शेकडो भाविक व पालखी मंडळे वाद्यवृंद वाजवत येत असतात. त्यांना सुखकर दर्शन व्हावे, दर्शनासाठी रांगेत उभे असणाऱ्या वृद्ध, महिला, लहान मुलांना श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे,तहसीलदार कार्यलय, जिखाधिकारी कार्यालय यांच्याकडून मनसोक्त , सुलभतेते, सहज दर्शन व्हावे , भक्तांना सुख सोयी मिळाव्यात, भाविकांच्या सहकार्याने कार्ला फाटा ते गडावर अनेक ठिकाणी पाणी वाटप, आरोग्य सुविधा,मोफत अन्नदान इत्यादी उपक्रमांना प्राधान्य देऊन देवीची सेवा करण्याची संधी द्यावी , गडावर भक्तांना येण्या जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात यावा , दुकानदार , फुल - हार विक्रेते , रिक्षा संघटना याबाबतही चर्चा केली .


पुजारी,गुरव प्रतिनिधी व कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात याव्यात, भाविकांची लुट फसवणूक होऊ नये तसेच यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून भाविकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे याबाबतही चर्चा केली. यात्रे निमित्त प्रचंड प्रमाणात येणाऱ्या गाडयामुळे होणारी वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्या संदर्भातही चर्चा झाली. लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी ( आयपीएस) श्री. सत्य साई कार्तिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.किशोर धुमाळ साहेब यांनी श्री एकविरा देवी पालखी सोहळा परंपरेनुसार शांततेत संपन्न होण्याकरिता सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले. भाविकांनीही पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करून येत्या आठवड्यात आगरी कोळी समाजाचे प्रतिनिधी, पालखी प्रमुख, श्री एकविरा देवस्थान विश्वस्त , ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत एक संयुक्त बैठक घेणार असल्याची सांगितले. या बैठकीत आई एकविरा यात्रा परंपरेनुसार पार पाडण्याकरिता उपाययोजना , भक्तांनी सहकार्य करण्याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |