लेकीच्या यशाची उतुंग भरारी पाहून आई वडिलांच्या डोळ्यात कौतुकाची चमक
डोंबिवली ( शंकर जाधव ) : दीर्घ प्रतीक्षेनंतर जान्हवी राजकुमार कोल्हे दिग्दर्शित 'सिंपल आहे ना 'ही वेब सिरीज चित्रपट दिनांक २४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. सहज सुंदर विषय घेऊन उत्कृष्ट रित्या दिग्दर्शन करून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चित्रपटाचे आयोजन डोंबिवलीतील जे एम एफ मंडपमधे करण्यात आले होते.लेकीच्या यशाची उतुंग भरारी बघत असताना आई वडील म्हणून डोळ्यात दिसणारी अभिमानाची , कौतुकाची चमक डॉ.राजकुमार कोल्हे आणि डॉ प्रेरणा कोल्हे यांच्या डोळ्यात दिसत होती.
जे एम एफ संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे आणि सचिव डॉ. प्रेरणा कोल्हे यांनी निर्मिती केलेला हा पहिलाच चित्रपट तर ह्या आधी अनेक मालिका, वेब सिरीज दिग्दर्शन करून चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या दिग्दर्शिका जान्हवी राजकुमार कोल्हे यांचाही पहिलाच चित्रपट.
लॉक डाऊन सारख्या काळात देखील प्रयत्न, जिद्द, चिकाटी , आत्मविश्र्वास ,आणि कष्ट करून दिग्दर्शन केलेला सिंपल आहे ना हा चित्रपट जान्हवी राजकुमार कोल्हे आणि त्यांच्या पूर्ण टीम ने तयार केला.२४ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाच्या उद्घाटन प्रसंगी दीप प्रज्वलन करून उद्योगपती सुभाष जी मालवे, डॉ. कुमार सिंग, डॉ.लढ्ढा, डॉ.श्री व सौ गुजराथी , केशव भोईर व अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवून दिग्दर्शिका जान्हवी राजकुमार कोल्हे यांचे कौतुक केले.
शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत असतानाच चित्रपट क्षेत्रात दिग्दर्शनाचे पदार्पण केलेल्या आमच्या कन्येला भरभरून यश संपादन होऊ दे हीच आमची प्रार्थना आणि सदिच्छा, असे बोलून अध्यक्ष डॉ राजकुमार कोल्हे आणि डॉ प्रेरणा कोल्हे यांनी त्यांचा लेकीला आशीर्वाद दिला व पाठीवर कौतुकाची थाप दिली. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांमध्ये हा चित्रपट जे एम एफ मंडपंम् मधे दाखवण्यात आला. चित्रपटातील कलाकार आयुषी भावे, सिद्धार्थ खिरिद, सिद्धार्थ आखाडे ( लेखक ) व अनेक नामवंत कलाकारांच्या उपस्थितीत ५०० प्रेक्षकांनी सिंपल आहे ना ह्या चित्रपटाचा आनंद घेतला.
दिग्दर्शिका जान्हवी राजकुमार कोल्हे यांच्या बरोबरच चित्रपटाचे गीतकार संगीतकार आकश सावंत देसाई, प्रोडक्शन मॅनेजर व अभिनेताअखिल नायडू, असि.दिग्दर्शक रोहित राजगुरू व देवेश दाते,नृत्य दिग्दर्शक आकाश पवार , एडिटर चिन्मय आणि महादेव जग्गी , वेशभूषा मनस्वी खरसेकर या संपूर्ण टीम चे डॉ राजकुमार कोल्हे आणि डॉ प्रेरणा यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सिनेमा संपल्यावर उपस्थित सर्व मान्यवर आणि प्रेक्षकांनी भरभरून अभिप्राय देऊन कौतुकाचा वर्षाव केला.अमेझॉन, प्लॅनेट मराठी, हंगामा, एम एक्स प्लेअर अशा आणि अनेक मोठ्या प्लॅटफॉर्म वर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.ममता राय यांनी आभार प्रदर्शन केले व सौ श्रेया कुलकर्णी यांनी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.