पाल्यांच्या पासून मतदानाचा संदेश पालकांपर्यंत
कल्याण पूर्वेतील शाळांमध्ये जनजागृती अभियान
कल्याण (विनोद वास्कर ) : आई बाबांना सांगा लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होण्यासाठी असं आवाहन निवडून आयोगाकडून सुरु करण्यात आलं आहे. कल्याण पूर्वेतील खासगी आणि शासकीय शाळांमध्ये निवडणूक आयोगाकडून जनजागृती सुरु करण्यात आली आहे. पाल्यांपासून पालकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. तसेच विद्यार्थ्यांनी देखील निवडणूक आयोगाचे फलक हातात घेऊन आई बाबांना मतदान करण्यासाठी सांगणार असल्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवावी यासाठी निवडणूक आयोगाने कल्याण पूर्वेत कंबर कसली आहे. कल्याण पूर्वेतील शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन निवडणूक आयोग विद्यार्थ्यांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जनजागृती करत आहे. आपल्या पालकांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्याचं संदेश निवडणूक आयोगाने शाळांमध्ये केलं आहे.
निवडणूक आयोगाच्या या आवाहनाला विद्यार्थ्यांकडून देखील साकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.नुकताच वीटभट्टी कामगारांना मतदान करण्याचे आवाहन केल्या नंतर आता पालकांना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आवाहन केल्याचे संदेश सध्या निवडणूक आयोगाचे चर्चेत आले आहे. त्यामुळे यंदा कल्याण लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढते का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.