डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कपिल पाटील यांनी आभार मानले. या वेळी निवडणुकीतील प्रचाराबाबत राज ठाकरे यांनी काही सूचना केल्या. या वेळी मनसेचे आमदार राजू पाटील, अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि डी. के. म्हात्रे आदींची उपस्थित होतें.