ठाणे, दि. 20 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण लोकसभा मतदारसंघात आज दि. 20 मे 2024 रोजी सकाळी 7.00वा.पासून सुरुवात झाली. 24 कल्याण मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1.00 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 22.52 टक्के मतदान झाले आहे.
ठाणे जिल्ह्यातील 24 कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
140 अंबरनाथ – 23.12 टक्के
141 उल्हासनगर – 21.56 टक्के
142 कल्याण पूर्व – 22.44 टक्के
143 डोंबिवली – 20.78 टक्के
144 कल्याण ग्रामीण – 24.27 टक्के
149 मुंब्रा कळवा – 21.93 टक्के
ही आकडेवारी अंदाजे असून अंतिम आकडेवारी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे.