Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

डोंबिवलीतील स्फ़ोटात 25 वर्षीय तरुणीचा मृत्यू




डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीजवळील सोनारपाडा येथील अमुदान कंपनीत गुरुवार 23 तारखेला भीषण स्फ़ोटात आता पर्यत 13 जणांचा मृत्यू झाले.यात एका 25 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी कदम (25) या तरुणीचा मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटत नव्हती. रोहिणीने परिधान केलेला मेहंदी रंगाचा ड्रेस आणि तिच्या दाताला बसवण्यात आलेल्या तारेवरून तिच्या चुलत भावाने मृतदेह रोहिनीचाच असल्याचं सांगितले.

मूळची रायगड जिल्ह्यातील कोलमांडला येथील रोहिणी कदम हिच्या पदवी पर्यंतचे शिक्षण झाला असून एमआयडीसीत एका कंपनीत काम करत होती. रोहिणी खूप खुश होती कारण गुरुवारी रोहिणीच्या आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि शुक्रवारी डोंबिवली मधील आजदे मध्ये नवीन घेतलेल्या घराचे गृहप्रवेश होणार होता.
स्फोटाची माहिती रोहिणीच्या नातेवाईकांना समजली तास त्यांनी ठिकठिकाणी धाव घेतली. पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आणण्यात आला आहे अशी माहिती समजताच रोहिणीचे नातेवाईक पोहचले असता त्यांना मृतदेह दाखवण्यात आला. परंतू मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटत नव्हती. रोहिणीने परिधान केलेला मेहंदी रंगाचा ड्रेस आणि तिच्या दाताला बसवण्यात आलेल्या तारेवरून तिच्या चुलत भावाने तो मृतदेह रोहिनीचाच असल्याचं सांगितले. त्यानंतर खात्री करण्यासाठी रोहिणीच्या सख्या भावाला सुद्धा हॉस्पिलमध्ये बोलावण्यात आले. त्यानंतर ही रोहिणीच असल्याचं समजताच कुटुंबीयांना धक्का बसला. 

रोहिणीच्या आजदे येथील घरात रोहिणी गृहप्रवेश करणार होती असे एका शेजाऱ्याने सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |