ठाणे / शिळफाटा ( विनोद वास्कर ) : शाळेसाठी स्वतःची करोडो रुपयाची जागा ज्यांनी दान दिली अशा महान व्यक्ती त्यांचं नाव आहे.कै.हाशा रामा पाटील या दानशूर व्यक्तीचे सुपुत्र शिळगांवातील सर्वांचे लाडके आणि आवडते शिक्षक संतोष हाशा पाटील ज्यांनी आपल्या आयुष्याचे २२ वर्ष शिक्षक म्हणून हाशा रामा पाटील या माध्यमिक आणि उंच माध्यमिक विद्यालय मध्ये आयुष्य काढलं आणि दोन वर्ष मुख्याध्यापक आणि प्राचार्य म्हणून त्यांनी काम केलं. स्वतः दिव्यांग व्यक्ती असून सुद्धा त्यांनी ग्रामस्थांच्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षणाच्या मनात एक चांगले स्वतःचे स्थान निर्माण केलं होतं. एक चांगलं शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांवर छाप सोडली. एक मायेचा हात त्यांच्यावर ठेवला. अशा शिक्षकांच आणि मुख्याध्यापकांची आज प्राणजोत मावली आणि आज त्यांचं निधन झाले.
शिळ गावच्या स्मशान भूमी मध्ये पाटील यांना निरोप देण्यासाठी त्यांचे लहान लहान विद्यार्थी वर्ग शिक्षक आणि ग्रामस्थ हजारोच्या संख्येने उपस्थित होते. अनेक धर्मातील नागरिक सुद्धा त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले होते.
हाशा रामा पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष हाशा रामा पाटील यांचं आज निधन झालं आहे. त्यांच्या आत्म्यास सुख शांती लाभो. म्हणतात ना जो आवडेल सर्वांना तोच आवडेल देवाला. खरंच खूप व्यक्ती चांगली होती. संतोष पाटील यांच्या जाण्याने विद्यार्थी शिक्षक आणि ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहे. सर्वांसाठी हा मोठा धक्काच आहे. आणि तो पचवणं सर्वांना शक्य होईल असं वाटत नाही. शाळेमध्ये चांगल्या सुविधा कशा येतील यासाठी सतत प्रयत्न करणारे आणि विद्यार्थ्यांना जास्तच जास्त शिक्षणाचा लाभ कसा होईल यासाठी सतत प्रयत्न असायचा. विद्यार्थ्यांविषयी पालकांना समजून सांगणारे आमचे गावचे मुख्याध्यापक संतोष पाटील. खरंतर आमच्यासाठी आमच्या गावासाठी शान होती. शाळेमध्ये शिक्षक होणे आणि त्यातून मुख्याध्यापक होणे फार मोठी गोष्ट आहे. आतापर्यंत त्यांच्या हाताखालून बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेऊन वकील, डॉक्टर, शिक्षक, पोलीस, बँक मध्ये मॅनेजर आणि उद्योगधंद्यात नोकरीत स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत. संतोष पाटील यांच्या निधनामुळे समाजात पोकळी निर्माण झाली आहे. ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कायम उणीव भासत राहील.
मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या विषयी बोलायचे झाले तर स्वतःचा घरून आलेल्या टिफिन विद्यार्थ्यांना खायला द्यायाचे. विद्यार्थी सुद्धा आपल्या घरचे पालक आपल्यासमोर आहेत असं समजून त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी मांडत होते. विद्यार्थ्यांच्या मनात बसलेली भीती अडचण संतोष पाटील शिक्षक नेहमी सोडवत आले होते. त्यांचा प्रेमळ स्वभाव,मनमिळाऊ स्वभाव, सर्वांना आपलेसे करणारे माणुसकी जपणारे असा त्यांचा स्वभाव होता. शाळेच्या पायापासून ते छपरापर्यंत त्यांनी कायापालट केला होता. शाळेची रंगरंगोटी, लॅपटॉप, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बँच, पंखे, पिण्याचा प्रश्न ,सीसीटीव्ही कॅमेरे प्रयोगशाळेचा लॅब मध्ये सर्व साहित्य उपलब्ध करून देणे. कमी खर्चामध्ये मुलांना गणवेश उपलब्ध करून देणे. या मुलांना शाळेची फी भरता येत नव्हती त्यांची सुद्धा फ्री माफ करायचे किंवा संस्थेमार्फत त्यांची फी माफ करून घ्यायचे किंवा स्वतः भरायचे. खरंतर त्यांना आज निरोप देण्यासाठी आलेले नातेवाईक मंडळी, ग्रामस्थ, लहान लहान विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक यांच्या डोळ्यातून पाणी येत होते. सर्वांसाठी भाऊक क्षण होता. खरंतर सर्वांसाठी हा काळा दिवस होता.