उरण दि ६ ( विठ्ठल ममताबादे ) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील ६ मे २०२४ रोजी उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील गावागावात प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. या गावभेटी प्रचारदौऱ्यात त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यातील गावभेटी दौऱ्यात उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या महाविकास आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांबरोबर जासई येथील शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करीत प्रचाराला प्रारंभ केला. यावेळी प्रत्येक गावातील नाक्या नाक्यावर महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केले. प्रचार दौऱ्यात उन्हाची तमा न बाळगता, तरुणाई बरोबर महिलाही एकवटल्या होत्या.
तालुक्यातील प्रचारात गाव भेटीमध्ये संजोग वाघेरे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी गावागावातील वातावरण दणाणून गेले होते. गावागावात त्यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा भरभरून पाठिंबा मिळत होता. नागरिकांकडून त्यांचे स्वागत केले जात होते. आणि विजयासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत होत्या. हुकूमशाही मोदींविरोधात देशातील जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ही मोदींविरोधात लोकशाहीची लढाई आहे. हुकूमशाही थांबवण्यासाठी महाविकास आघाडीला ही लढाई जिंकलीच पाहिजे असे आवाहन नेते मंडळी नागरिकांना आपल्या भाषणातून करत होते. मोदी सरकारने आजपर्यंत देशातील जनतेची महागाई, बेरोजगारी, शेतीमालाचा हमीभाव अशा विविध प्रश्नी फसवणूक केली आहे. असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या प्रचारातील प्रतिसादामुळे मावळ मतदार संघात विजयाची माळ उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्याच गळ्यात पडणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्या प्रचार दौऱ्यात उमेदवार संजोग वाघीरे यांच्या समवेत शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटील,माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, इंडिया आघाडीचे भूषण पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख नरेश रहाळकर, काँग्रेसचे उपजिल्हाप्रमुख मिलिंद पाडगावकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर सी घरत,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, माजी सभापती नरेश घरत, शिवधन पथसंस्थेचे चेअरमन गणेश म्हात्रे, महिला काँग्रेस अध्यक्षा रेखा घरत, शेकापक्षाच्या सीमा घरत, महादेव बंडा, शेकापचे विकास नाईक, सरपंच काका पाटील, सरपंच संतोष घरत, सरपंच भास्कर मोकल, प्रफुल्ल खारपाटील, रवी घरत, सुरेश पाटील, गणेश म्हात्रे, तसेच तालुकास्तरावरील सर्व पक्षाचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.