Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतील; आठवडाभर ट्राय करा 'या' पेस्ट



आपली स्माइल सुंदर असावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. मात्र अनेक व्यक्तींचे दात पिवळे असतात. कितीही ब्रश केले तरी दातांचा पिवळेपणा काही जात नाही. त्यामुळे अनेक जण वर्षातून एकदा तरी डेंटिस्टकडे जाऊन दात स्वच्छ करून घेतात. त्यामुळे आज दात स्वच्छ करण्याच्या काही सिंपल ट्रिक्स जाणून घेऊ.

खोबरेल तेल

प्रत्येकाच्या घरात खोबरेल तेल असते. त्यामुळे दात स्वच्छ करताना दोन थेंब खोबरेल तेल घ्या आणि दातांवर अप्लाय करा. तुम्ही ब्रशवर दोन थेंब टाकून त्याने देखील दात घासू शकता. असे केल्याने 1 आठवड्यात रिजल्ट दिसेल.

लिंबाची साल

लिंबू हे असं फळ आहे ज्याचा रस तांबे पितळेच्या भांड्यावर टाकला की ते चकचकीत होतात. त्यामुळे लिंबाची साल तुम्ही दातांवर घासू शतकता. असे केल्याने देखील तुमच्या दातावर असलेला पिवळेपणा कायमचा गायब होईल आणि तुम्हाला सुंदर आणि छान स्माइल मिळेल.

बेकिंग सोडा

अनेक व्यक्तींची त्वाचा सेंसेटीव्ह असते त्यामुळे कोलगेटने त्यांना त्रास होतो. अशावेळी त्या व्यक्ती व्यवस्थीत ब्रश देखील करत नाहीत. त्यामुळे दातांवरील पिवळेपणा आणखी वाढतो. हा पिवळेपणा घालवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा आणि त्यावर लिंबाचा रस टाकून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट दातांवर लावल्यानंतर पिवळेपणा गायब होईल.

केळीचा साल

केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मॅगनीझ असते. त्यामुळे दातांचा हट्टी पिवळेपणा याने चुटकीसरशी निघून जातो. जेवणानंतर अनेक व्यक्ती केळी खातात. त्यामुळे रात्रीच्या जेवणानंतर तुम्हीही केळी खात असाल आणि रात्री झोपण्याआधी ब्रश करत नसाल तर ही साल फेकू नका. केळी खाऊन झाल्यावर काही वेळाने या सालीने दात घासून घ्या.

स्टॉबेरी

स्टॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडेंट्स असते. त्यामुळे दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी डॉक्टर देखील स्टॉबेरी खाण्याचा सल्ला देतात. तुम्ही देखील दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी बेकींग सोडा आणि स्टॉबेरी यांची पेस्ट करून घ्या. ती दातांवर घासा. अशा काही सिंपल ट्रीक्सने तुमचे दात मोत्यासारखे चमकतील.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |