ठाणे : महाराष्ट्र दिनाच्या 64 वा वर्धापन दिनानिमित्त वागळे इस्टेट येथील जिल्हा परिषद ठाणे इमारतीच्या आवारात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कार्यक्रम सकाळी 07:15 वाजता संपन्न झाला. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक छायादेवी शिसोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत व राज्यगीत गात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ध्वजवंदन केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग) अतुल पारसकर, कार्यकारी अभियंता प्रदिप कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललीता दहितुले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिल्या. सामान्य प्रशासन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्तमरित्या कार्यक्रमाची तयारी केली होती. रवींद्र तरे, धिरज भोईर, सुरेश जाधव, हरीश शेलार यांच्या शिक्षक युवा कलामंच मार्फत महाराष्ट्रगीत व ध्वजगीत सामुहीक गायन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अनिल सुर्यवंशी यांनी केले.