उरण दि ६ ( विठ्ठल ममताबादे ) : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या कार्याचा व विचारांचा प्रसार व प्रचार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था या सामाजिक संस्थेतर्फे नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.सध्याचे गोर गरिबांची आर्थिक परिस्थिती व संस्थेचे योगदान लक्षात घेता गोर गरिबांना मदत करावे या अनुषंगाने शिर्डी येथील गरजू नागरिकांना शर्ट तसेच साड्यांचे चे वाटप करण्यात आले.
यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, खजिनदार सुरज पवार, संपर्क प्रमुख सादिक शेख, सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील,शिर्डी येथील जेष्ठ पत्रकार राजेंद्र दिनबुळे,सदस्य रवि म्हात्रे,श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सदस्य यावेळी उपस्थित होते.
गरजू नागरिकांना कपडे मिळाल्याने आनंद व्यक्त करत नागरिकांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे आभार मानले.