डोंबिवली : डोंबिवलीतील उत्पादन शुल्क विभागाकडून निळजे येथील कासा रीओ रोड, लोढा हेवन, डोंबिवली (पुर्व) ता. कल्याण, जि. ठाणे या ठिकाणी बेकायदेशीर विनापरवाना विदेशी मद्य व बिअर वाहतुकीवर प्रोव्हीबीशन गुन्ह्या अंतर्गत छापा टाकून त्यांच्यावर गुन्हा नोंदवून एक मॅकझीमो कंपनीची चार चाकी संफेद रंगाची टेम्पो गाडी पकडून जप्त केली असून एकूण १८८ लिटर विदेशी मद्य व बिअर असा एकूण ४,१३,४७०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई मा. विजय सुर्यवंशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, प्रसाद सुर्वे, संचालक (अ.व.द.मुंबई) प्रदिप पवार विभागीय उप-आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोकण विभाग, ठाणे व डॉ. निलेश सांगडे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली किरणसिंग देविसिंग पाटील, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, डोंबिवली, प्रशांत निकाळजे, दुय्यम निरीक्षक, सागर धिडसे, दुय्यम निरीक्षक, रंजित आडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, एच.एम. देवकते, सहाय्यक दुय्यम निरीक्षक व अमृता नगरकर, महिला जवान यांनी यशस्वीरीत्या केलेली आहे.