दिवा - कल्याण लोकसभेतील दिवा शहरात महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी महायुतीची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीला दिवावासीयांनी अक्षरशः तुफान असा प्रतिसाद दिला.
आगासन रोडवरील बेडेकर नगरपासून सुरू झालेली ही रॅली गणेश नगर, विकास म्हात्रे गेट, दातीवली, ओमकार नगर, सिद्धिविनायक गेट, दिवा चौक यामार्गे मुंब्रादेवी कॉलनी पर्यंत काढण्यात आली. या रॅलीत ठिकठिकाणी दिवावासियांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर फुलांचा वर्षाव आणि फटाक्यांची आतिषबाजी करत अतिशय उत्साहात आणि जल्लोषात डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वागत केले. दिवा वासियांचा हा उत्साह पाहून हा प्रचाराचा नव्हे, तर विजयाचाच जल्लोष असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.
या रॅलीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाइं यासह मित्रपक्षांचे कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिक प्रचंड मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनी चहूबाजूंनी केलेला फुलांचा वर्षाव, ठिकठिकाणी केलेले औक्षण, स्वागत हे संपूर्ण चित्र अगदी संस्मरणीय होते.
या रॅलीत शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण लोकसभा निरीक्षक, दिवा शहर प्रमुख रमाकांत मढवी, मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष निलेश कापडणे, भाजपाचे सचिन भोईर, प्रशांत गावडे, रिपाइंचे दिनेश पाटील, शिवसेना उपशहरप्रमुख आदेश भगत, माजी नगरसेवक शैलेश पाटील, दर्शना म्हात्रे, अमर पाटील, सुनीता मुंडे, दीपाली भगत, दीपक जाधव, युवती सेना शहर अधिकारी साक्षी मढवी, शिवसेनेचे ब्रम्हा पाटील, गणेश मुंडे, अमर पाटील, निलेश पाटील, मनसेचे परेश पाटील, देवेंद्र भगत, शरद पाटील, मनसे शाखाध्यक्ष शैलेंद्र कदम, नम्रता खराडे, शिवसेचे अनिल भुवड, विशाल मढवी, विनोद मढवी, रुपेश मढवी, प्रशांत कदम, विठ्ठल घेवडे, राम पवार, योगेश कारंडे, जयदास शेलार, राजेश पाटील, सचिन चौबे, दीपक जाधव, अमर पावले, शशिकांत पाटील, भालचंद्र भगत, कैलाश पाटील, उमेश पाटील, उमेश भगत, समीर पाटील, अर्चना पाटील, विपुल मुंडे, चरणदास म्हात्रे, सुरेश पाटील, शरद पाटील, भाजपाचे सतीश केळशिकर, विजय भोईर, सपना भगत यांच्यासह महायुतीचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले होते.