उरण दि ९ (विठ्ठल ममताबादे ) सामुहीक शिक्षणाचे पुरस्कर्ते, शिक्षणतज्ञ, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक,कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज ६५ वी पुण्यतिथी. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधूता यांचे संस्कार समाजाला दिले. आपल्या ताटातील अर्धी भाकरी समोरच्याला देण्याची शिकवण कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिली. कर्मवीरांच्या विचारांना आदर्श मानणारे रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग बॉडी कौन्सील मेंबर तथा रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष, कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सातारा येथील समाधीस्थळी दर्शन घेऊन अभिवादन केले.