डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील होली एंजल्स ज्युनियर कॉलेजचा गेली 19 वर्षे सतत सर्वोच्च श्रेणीत निकाल लागत असून यावर्षीही एचडीसी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ओमन डेव्हिड असून प्राचार्य बिजॉय ओमन आहेत.
एचडीसी परीक्षेत 12 वी कॉमर्स विभागात प्रथम तीन क्रमांकात साहिल रामरतन सोनी 93.33 टक्के, रिया जेकब 93.00 टक्के, श्रेयश तुकाराम पुथर - 90.83 टक्के गुण मिळाले आहेत.
तर १२वी सायन्स विभागातील प्रथम तीन क्रमांकात स्वराली जनार्दना संते - 85.33 टक्के, हर्षिता विनोद व्यास - 84.67 टक्के, सबरेश गोविंदा अय्यर - 81.83 टक्के गुण मिळाले आहेत. कॉलेज तर्फे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. थोडयाच दिवसांत विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या भरघोस यशाबद्दल कॉलेज तर्फे त्यांचा कौतुक सोहळा करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ओमन डेव्हिड यांनी सांगितले.