डोंबिवली ( शंकर जाधव ) : महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदार गुरुवार 2 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, यासह अनेक नेते उपस्थित होते.कल्याण लोकसभेला एक आदर्श, काम करणारा, संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार मिळाला आहे. गेल्या १० वर्षांत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या कामाची पोचपावती आजच्या मिरवणुकीत नागरिकांनी दिलेली आहे. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे यांना आपण आता थेट विजयाच्या आणि हॅट्रिक शुभेच्छा देऊया, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
डोंबिवलीचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक दर्शन घेत आपल्या रॅलीला सुरूवात केली. आप्पा दातार चौकातून डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती भागातून लोकमान्य टिळक चौकामार्गे संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलापर्यंत ही रॅली निघाली.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील, शिवसेनेचे ओवळा-माजीवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार रविंद्र फाटक, शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के, भाजपाचे मुरबाडचे आमदार किसन कथोरे, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे आनंद परांजपे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्यासह शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष यांसह युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे,जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, तालुका प्रमुख महेश पाटील, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे,कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड,माजी नगरसेवक रणजित जोशी, नितीन पाटील, रवी पाटील,संतोष चव्हाण, गोरखनाथ( बाळा ) म्हात्रे, संदीप सामंत, भाजपा लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, मितेश पेणकर, समीर चिटणीस, रवीसिंग ठाकूर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कल्याण लोकसभेच्या विकासासाठी निधीची कुठलीही कमी भासू देणार नाही याची खात्री मी देतो, असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. कामाच्या माध्यमातून डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे बूथ लेव्हलला काम करा आणि बूथ जिंका. मतदान वाढेल असे काम केले पाहिजे, तरच डॉ. श्रीकांत शिंदे यांना मताधिक्याचा रेकॉर्ड मोडता येईल, असे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले. उन्हाळी सुट्टी आणि लग्न सराईमध्ये काही लोक गावी गेले आहेत. त्या सर्वांना विनंती करून डॉ. श्रीकांत शिंदे यांना मतदान करा, असे आवाहन करायचे आहे. तरच नवा विक्रम आपण नोंदवू. डॉ. श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजे मोदीजींना मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे मोदींना मत, महायुतीला मत म्हणजे मोदीजींना मत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी २० तारखेपर्यंत मेहनत करायची आहे. २० तारखेनंतर पुढील ५ वर्ष खासदार मेहनत करतील आणि मतदारसंघाची सेवा करतील.
यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनीही मिरवणुकीत सहभाग नोंदवला. श्री गणेश मंदिरापासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत विविध भाषिक, विविध संस्था, संघटनांचे सदस्य सहभागी झाले. पंजाबी, दाक्षिणात्य, आगरी कोळी बॅंड पथक, वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात या मिरवणुकीची सुरूवात झाली. महायुतीच्या सर्व घटकपक्षांनी यावेळी शक्तीप्रदर्शन केले. महायुतीच्या घोषणांनी यावेळी डोंबिवलीतील रस्ते दुमदुमून गेले. उन्हाचा पारा चढलेला असतानाही मिरवणुकीतील गर्दीवर काहीही परिणाम झाला नव्हता. दुपारी बाराच्या सुमारास घरडा सर्कल चौकात मिरवणुकीची सांगता झाली. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तिसऱ्यांदा कल्याण लोकसभेसाठी उमेदवार म्हणून अर्ज सादर केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्या पत्नी लता शिंदे, मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे आणि मुलगा रूद्रांश शिंदे असे संपूर्ण शिंदे कुटुंब उपस्थित होते.