उरण दि २८ (विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत परीक्षेचा निकाल सोमवार दि २७ मे २०२४ रोजी ऑनलाईन जाहीर झाला. या परीक्षेत उरण येथील जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल ने आपल्या उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या शाळेचा दहावी परीक्षेचा एकूण निकाल १००% लागला असून कुमारी श्रुती रत्नाकर म्हात्रे या विद्यार्थिनी ने ९०.६०% गुण संपादन करून शाळेमध्ये सर्व प्रथम क्रमांकाने उतीर्ण होण्याचा मान मिळवलेला आहे. तसेच या शाळे मध्ये द्वितीय क्रमांक ने कुमार वेदांत, रवींद्र गावंड ह्याने ८७.६०% आणि कुमारी आर्या उत्तम गावंड हिने ८४.४०% तर कुमारी प्रियांशी पंकज म्हात्रे हिने ८४.४०% मिळवून तृतीय क्रमांक संपादन केले आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अशोक ठाकूर, खजिनदार वामन ठाकूर, सेक्रेटरी अलका ठाकुर, विश्वस्त सिंधू ठाकूर व प्रसाद ठाकूर, शाळेच्या मुख्याध्यापिका निकिता म्हात्रे व शिक्षक पालक संघाचा उपाध्यक्षा शुभांगी पाटील यांनी अभिनंदन केले आहे.