ठाणे - 12 जागा मिळालेल्या शिंदे गटात आता आणखी दोन मतदारसंघांची भर पडली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी माजी महापौर नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यापुर्वीही शिंदे गटाच्या नेत्यांकडून महायुतीतील 15 जागांवर दावा केला जात होता. त्यामुळे कल्याण, ठाणे, पालघर आणि नाशिक यापैकी तीन जागा तरी मिळाव्यात यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात होते. दरम्यान यापैकी दोन जागा पारड्यात पाडून घेण्यात शिंदे गटाला यश आलं आहे.
ठाणे आणि कल्याणही जागा शिंदे गटाला मिळाली आहे. शिंदे गटाच्या पहिल्या यादीत एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्याने विरोधकांकडून टीका केली जात होती. एकनाथ शिंदे मुलाची जागाही वाचवू शकले नसल्याचं बोललं जात होतं. मात्र यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ही जागा श्रीकांत शिंदेंनाच मिळणार असल्याचं जाहीर केलं होतं