कळवा पोलीस स्टेशनची उल्लेखनिय कामगिरी....
ठाणे : कळवा ठाणे परिसरात सन २०२३ व २०२४ या वर्षात विविध कंपनीचे मोबाईल फोन हरवलेले असून त्याबाबत कळवा पोलिस ठाण्यात प्रॉपर्टी मिसींगचे नोंदी करण्यात आलेल्या आहेत.
सदर मोबाईल हरवल्याचे अनुषगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अशोक उतेकर, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल गायकवाड यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.उप.निरी. सागर सांगवे व पथक यांना सदर प्रॉपर्टी मिसिंगची प्रकरणे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने दाखल प्रॉपर्टी मिसिंग मधील मोबाईल फोन बाबतची सविस्तर माहिती CEIR या ॲपमध्ये भरून त्यानुसार माहिती विविध तांत्रिक पध्दतीने बारकाईने विश्लेषण करून त्याआधारे हरविलेल्या मोबाईल फोनचे पत्त्यासंदर्भात अत्यत कौशल्यपुर्ण माहिती प्राप्त करून सदर रहाते पत्ताची शहानिशा करून, रहाते पत्यावर जावून संबंधीत विवीध मोबाईल धारकाकडून एकूण ६७ विवीध कंपन्यांचे मोबाईल फोनचा शोध घेवून गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनिरी/ सागर सांगवे, व तपास पथकातील अमंलदार यांनी वरिलप्रमाणे प्रॉपर्टी मिसींग मधील ६,१०,०००/रुपये (सहा लाख दहा हजार रुपये एकूण किमतीचे मोबाईल फोन दस्तगत करून उल्लेखनीय कामगीरी केलेली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त आशुतोष डुबरे मा. पोलिस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अप्पर पोलिस आयुक्त सो पश्चिम प्रादेशिक विभाग ठाणे विनायक देशमुख, मा.पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ सुभाषचंद्र बुरसे, मा सहायक पोलीस आयुक्त सो उत्तम कोळेकर, कळवा विभाग ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली व त्यांनी दिलेल्या सुचानाप्रमाणे करण्यात आलेली आहे.
मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर कळवा पोलीस स्टेशन, ठाणे, पोलीस निरीक्षक गुन्हे अनिल गायकवाड, गुन्हे प्रकटिकरण पथकाचे पोउपनिरी/ सागर सांगवे पोहवा/४४४६ शहाजी एडके, पोहवा/६५३१ दादासाहेब दोरकर, पोहवा ६६१४ राहुल पवार, पोहवा ६६७५ श्रींमत राठोड, पोहवा / ३७९३. रमेश पाटील, पोलीस शिपाई २७५५ अमोल डावरे, पोलीस शिपाई ८०६६ प्रशांत लवटे यांनी CEIR अॅपच्या मदतीने व विवीध तांत्रीक पष्टतीने व बारकाईने विश्लेषन करुन सदरची उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे.
.