Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

मतदानाबाबत मानवी साखळीच्या माध्यमातून जनजागृती




ठाणे, दि.07  : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीपच्या माध्यमातून ठाणे शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मानवी साखळीच्या माध्यमातून मतदानाचे विविध संदेश हातात घेवून नागरिक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून जनजागृती करीत असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी येणारी वाहने लक्ष वेधून घेत आहेत तर वाहनांमधील नागरिकांचा देखील या जनजागृतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे २५ ठाणे-लोकसभा मतदार संघअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ सहा.निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांनी नमूद केले.

लोकसभा मतदानात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ठाणे शहरात १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून विविध जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी मतदान करावे, यासाठी विद्यार्थ्यांच्या मार्फत आणि बचतगटातील महिलांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्यात येत आहे. .

मतदान जनजागृती उपक्रमाचा भाग म्हणून १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघ,स्वीप पथक वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवत आहेत. ज्या प्रभागात कमी मतदान झाले आहे त्या प्रभागात रिक्षा फिरवून ऑडियो द्वारे प्रसार करण्यात येत आहे. मी मतदान करणारंच..... आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा. या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दिनांक २० मे २०२४ असे दर्शवणारे माहितीपत्रक सर्व नागरिकांना वाटण्यात आले. लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दिनांक २० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन स्वीप पथकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |