डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाराष्ट्र दिन व कामगार दिन आणि छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचा ६४ वा वर्धापन दिन निमित्ताने नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण शाळेच्या भव्य पटांगणावर ८० फूट बाय ८० फूट आकाराची २० मे रोजी होणाऱ्या लोकसभा मतदान जनजागृती साठी पालक मतदारांना जागृत करण्यासाठी या महा रांगोळीचे आयोजन करण्यात आले.
शाळेतील कलाशिक्षक श्रीहरी पवळे आणि विद्यार्थी यांनी एकूण तीन तासात ही रांगोळी साकारली यासाठी तीनशे किलो रांगोळी वापरली.
या उपक्रमाचे कौतुक करण्यासाठी छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत तरटे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी सरकटे साहेब त्याचबरोबर शालेय समिती सदस्य नेवे माजी शिक्षिका डहाळे, कुंटे शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद, परिवेक्षक संतोष कदम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भारती वेदपाठक, पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली साबळे त्याचबरोबर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील विद्यार्थी पालक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या उपक्रमशील शाळेचे आणि कलाशिक्षक श्रीहरी पवळे यांचे कौतुक केले.