मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे रोजी अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई केली. या संपूर्ण कारवाईमध्ये 59 हजार 980 लीटर दारू व इतर भट्टी साहित्यासह एकूण 23 लाख 55 हजार 210 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई ठाणे जिल्ह्यातील दिवा गाव, घेसर, खर्डी, अलीमघर, छोटी देसाई, मोठी देसाई, आगासन, सरळांबे, अंजुर, वाशाळा, वसरगाव, हाजी मलंग, कुशिवली, माणेरागाव, द्वारलीपाडा, कुंभार्ली, केवणी, कालवार, वडुनघर, मामेखर्डी, कारीवली, मामणोली, जांभुळगांव, नांदपगाव, केशव सृष्टी, उत्तन, मुरदागाव, कोपराखाडी, गोराई खाडी आदी ठिकाणी करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईमध्ये 31 दारूबंदी गुन्हे नोंद करण्यात आले आहे.
हेही वाचा : ठाणे शहर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशनचे सुयश ; 16 खेळाडूंची राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत निवड
राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार, ठाणे अधीक्षक एन. व्ही सांगडे, उपअधीक्षक एस. टी माळवे, मुंबई शहरचे उपअधीक्षक सुधीर पोकळे, मुंबई उपनगर उपअधीक्षक मनोज चव्हाण, सुनील जाधव, जे. एस गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकसभा निवडणूक आचार संहितेचे गांभीर्य लक्षात घेता उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी ही कारवाई केली आहे. ही कारवाई संबंधित विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, जवान यांनी केली आहे, असे कोकण उपआयुक्त प्रदीप पवार यांनी कळविले आहे.