डोंबिवली ( शंकर जाधव ) :किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्रच्या वतीने 3 ते 5 मे पर्यत अहमदनगर ( अहिल्यानगर ) येथे पार पडलेल्या किकबॉक्सिंग स्पर्धेत ठाणे शहर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन ( पलावा ) खेळाडूंनी यश मिळवले आहे.या असोसिएशनमधील 16 खेळाडूंची चिल्ड्रन, कॅडेट आणि जूनियर किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२४च्या राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.तर सात खेळाडूंनी पदक मिळविले आहे.
सुवर्णं पदक विजेते - अद्विक माजिला, अवनी केडिया, पुष्यजा सरकार, शौर्या गोरे, वेदिका राय, वृद्धि पाल, अवनीश सामंता, अभिवेद श्रीकुमार,मृत्युंजय रौत आणि रोप्य पदक विजेते - अभा दरेकर, निवेद्या श्रीकुमार, रेवा सक्सेना, दुर्वेश थेवर, कार्तिकेय राय, श्रेयस झा, व कांस्य पदक विजेतेअन्वी वर्मा, नम्रता गुप्ता, शाश्वत मोदी, रौणक गुप्ता अशी नावे आहेत.तर शुभा दरेकर, सार्थक खंडेलवाल, श्रवी गावडेया खेळाडूंनी स्पर्धेत उत्तम कामगिरी केली.यातील 16 खेळाडूंची 21 ते 26 मे पर्यत पुणे येथील बालेवाडी ,बॉक्सिंग हॉल मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत निवड झाल्याची माहिती
ठाणे शहर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन अध्यक्ष डॉ. शुभम मिश्रा यांनी दिली.
असोसिएशनचे चेअरमन विनोद रतन पाटील यांनी विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांचे या खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे.