Type Here to Get Search Results !
BREAKING NEWS

कमी किंमतीमध्ये विदेशी चलनातील डॉलर देतो असे सांगुन लोकांची फसवणुक करणाऱ्या ४ पुरूष व १ महीलेच्या टोळीला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद..

ठाणे  :
बृहनमुंबई शहरातील देवनार पोलीस स्टेशन, यांच्याकडील दाखल असलेला गुन्हा रजि नंबर ५६४/२०२४ भादंवि कलम ४२०,३४ या गुन्ह्यातील आरोपी हे ठाणे पश्चिमेकडील राबोडी येथील साकेत रोड वरील महालक्ष्मी मंदीरासमोर येणार असल्याची गुप्त बातमी खंडणी विरोधी पथकाला प्राप्त झाली होती.


सदर बातमीचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील सपोनि. सुनिल तारमळे, पोहवा. शिपी, भोसले, गुरसाळी, मपोहवा. पावसकर, पोशि. पाटील यांनी महालक्ष्मी मंदीरासमोर सापळा रचला असता १) हसन मुसा शेख, (वय: २९ वर्षे), रा. मानकोली नाका भिवंडी जि. ठाणे, मुळ राहणार शुकुरपुर, पो.ठाणे: लक्ष्मीनगर, नवी दिल्ली, २) वहावली अमीरअली खान,(वय: २६ वर्षे) रा. मानकोली भिवंडी जि. ठाणे मुळ राहणार- दासना, मसुरी जि. गाजियाबाद, राज्य. उत्तरप्रदेश, ३) हैदर नयान शेख, (वय: ३२ वर्षे) रा. मानकोली भिवंडी, जि. ठाणे, मुळ राहणार मु. काटपाडा ता. जि. उत्तर चौविस परगुता राज्य: पश्चिम बंगाल, ४) माजीदअली ताहीर हुसेन, (वय: ३९ वर्षे), रा. मानकोली गाव, ता. भिवंडी मुळ राहणार लौणी बेटा हाजीपुर ता. लोणी, जि. गाजीयाबाद राज्य उत्तरप्रदेश, ५) फरजाना उर्फ काजली अमीरउल्ला शेख,(वय: ३९ वर्षे) रा. मानकोली भिवंडी जि. ठाणे, मुळ राहणार गीताकॉलनी, रानी गार्डन, घर नंबर १५. दिल्ली हे सापडले. तसेच त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडुन गुन्ह्यातील रोख रक्कम तसेच मोबाईल असा एकुण १.८६,२००/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर आरोपी यांच्याकडुन १) देवनार पोलीस स्टेशन, मुंबई गुर.न. ५६४/२०२४ भादंवि कलम ४२०,३४, २) मानपाडा पोलीस स्टेशन, ठाणे शहर, गु.र.न. ९५३/२०२३ भादंवि कलम ४२०,३४ हे गुन्हे उघडकीस आले असुन त्यांनी नवीमुंबई, ठाणे, मुंबई परिसरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.


सदरची कारवाई मा पोलीस आयुक्त, ठाणे शहर आशुतोष डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण, मा अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), शिवराज पाटील, मा. सहायक पोलीस आयुक्त राजकु‌मार डोंगरे, शोध-२ (गुन्हे शाखा), ठाणे शहर, सहायक पोलीस आयुक्त शेखर बागडे, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील वपोनि. मालोजी शिंदे, मपोनि. वनिता पाटील, सपोनि. भुषण कापडणीस, सुनिल तारमळे, पोउनि. विजयकुमार राठोड, सपोउनि. सुभाष तावडे, संजय बाबर, पोहवा. सचिन शिंपी, गणेश गुरसाळी, भोसले, निलेश जाधव,मपोहवा. शितल पावसकर, मपोशि. मयुरी भोसले, पोशि. तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, विनोद ढाकणे, चापोना. भगवान हिवरे चामपोशि. ज्योती शार्दूल यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Design by - Blogger Templates |