डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पश्चिमेकडील ह प्रभाग कार्यालयातील मतदान केंद्रात मतदानाकरण्यासाठी आलेल्या मतदारांची भाली मोठी रांग लागलेली होती. उन्हात लाभ रांगेत उभे असलेल्या मतदानासाठी आलेल्या मतदारांना पाणी पिण्याची सुविधा , पंखा लाईट नसल्याने विजेचा तुटवडा जाणवत होता या समस्या बाबत मतदारांनी जाब विचारला हि समस्या ऐकून शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक गोरखनाथ ( बाळा) म्हात्रेयांनी , संदीप सामंत , मनोज वैद्य, अवि मानकर मतदान kकरण्यासाठी आलेल्या मतदारांना पिण्याच्या पाण्याची सुविधा मतदान केंद्रा बाहेर उपलब्ध करून दिली असता पोलिसांनी त्यांना अटकाव करीत पाणी देण्यास नकार केला असल्याचां आरोप केला.